ylliX - Online Advertising Network

सिडकोतील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटवणारच : आयुक्त तुकाराम मुंढे

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या वतीने”वॉक विथ कमिशनर” “walk with commissioner” या उपक्रमा अंतर्गत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राजे संभाजी स्टेडीयम, अश्विन नगर,नवीन नाशिक(सिडको) येथे नागरिकांशी संवाद साधला या ठिकाणी मांडलेल्या काही तक्रारींचे त्वरित निराकरण केले. commissioner walk tukaram mundhe nashik cidco

तसेच संबंधित खाते प्रमुखांना ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे सुचितकेले या ठिकाणी एकूण १३४  टोकनद्वारे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सिडको परिसरातील  अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे यांच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या, त्यावर मनापा लवकरच सिडको येथे अतिक्रमण विरोधी मोहीम सुरु करणार असे आयुक्त मुंढे यांनी घोषणा करून टाकली आहे.

आज झालेल्या १९ मे २०१८ च्या कार्यक्रमात एकूण १३४ टोकनवाटप करण्यात आले होते. टोकनद्वारे तक्रारी महापालिकेकडे नोंदवल्या गेल्या होत्या. त्यात

 • नवीन नाशिकविभागातील मैदानांची संख्या वाढवावी,
 • एसटी बस थांबा करावा, बससेवा सुरू करण्यात यावी,
 • ड्रेनेज पाइप लाईन चोकअप होते, चेंबर तुंबते, परिसरात पाणी प्रश्न असूनकाही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो,
 • काही भागात कमी व्यासाची पाईपलाईन असल्याने पाण्याची समस्या भेडसावते,
 • पावसाळ्यात पावसाचे व गटारीचेपाणी घरात येणे, commissioner walk tukaram mundhe nashik cidco
 • संजीवनी नगर मध्ये उद्यान करणे,
 • मोकळ्या जागेत व उद्यानात योगा हॉल विपश्यना केंद्र, अभ्यासिका, सभागृह बांधून मिळावे.
 • अतिक्रमणधारकांना नोटीस देऊनही अतिक्रमणा बाबतची कार्यवाही होत नाही,
 • सार्वजनिक शौचालयाचे दरवाजे बसवणे, मोकाट जनावरे कुत्रे यांचा त्रास,
 • व्यावसायिकांसाठी मनपाने गाळे उपलब्ध करून द्यावे,
 • घरगुती मालमत्तेचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जातो त्याची दखल घ्यावी,
 • गणेश चौक, विवेकानंदशाळा साफसफाई व्हावी.
 • रस्त्यावर कचरा टाकला जातो,
 • घरकुल योजनेत घर मिळत नाही.
 • स्टेडियमची दुरुस्तीकरावी, पाणी बाटली घेऊन जाण्यास मज्जाव करावा,
 • रो-हाऊस परिसराचे अतिक्रमण वाढलेले आहे,
 • शाळेचे विलीनीकरण करू नये.
 • दफनभूमीच्या जागी माती टाकून सपाटीकरण करावे.
 • बाजीप्रभू चौकात पावसाळय़ाचे पाणी साठते, commissioner walk tukaram mundhe nashik cidco
 • बाजी प्रभू चौक, शिवशंकर कॉलनीअभियंता नगर येथे पावसाळय़ाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठते.
 • उघड्यावर धुम्रपान करण्यास अटकाव करावा,
 • गणेश गार्डन झोके दुरुस्ती करावे,
 • उद्यानांना संरक्षकभिंती बांधावी,
 • फुथपाथची उंची वाढवावी.
 • पाथर्डी परिसर शनी मंदिर येथील तसेच परिसरातील पथदीप बसवावेत,
 • उद्यानात वृक्षारोपण करावे व स्प्रिंकल बसवावे, अशा विविध प्रकारच्या तक्रारी टोकन द्वारे तसेच नागरिकांनी समक्ष भेटून  आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडे मांडल्या.

त्याबाबत आयुक्त तुकाराम मुंढेयांनी समर्पक उत्तरे देऊन नागरिकांचे समाधान केले.तसेच या तक्रारी तातडीने सोडविण्याचा आदेश संबंधितखातेप्रमुखांना दिले. commissioner walk tukaram mundhe nashik cidco

या कार्यक्रमात बोलताना आयुक्त तुकाराम मुंढेयांनी सांगितले की नवीन नाशिक परिसरात अतिक्रमणा बाबत मोठ्या तक्रारी आहेत. ती अतिक्रमने  मनपा काढेल मात्र आपण सर्वांनी अतिक्रमणे वाढणारनाही याची दक्षता घ्यावी नवीन नाशिक परिसरातील ड्रेनेज लाईनवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढलेली आहेत ती व इतरही सर्व अतिक्रमणे स्वतःहून काढूनघ्यावेत सर्वांनी प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहनही यावेळी आयुक्त यांनी केले.

commissioner walk tukaram mundhe nashik cidco

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi , place and your name get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.