NASHIK College Road कॉलेज रोड परिसर : फॉरच्युनरवर पिंपळ कोसळला दोघे फोटो फीचर

शहरातील कॉलेजरोड परीसर  वरील  विठ्ठल मंदिराकडून  बॉइज टाऊनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या अजस्त्र अशा पिंपळवृक्षाचा निम्मा भाग रविवारी (दि.२०) रात्री दहा वाजेच्या सुमारास अचानकपणे फॉरच्युनरवर (एम.एच१५ सीटी ३९००) कोसळल्याने कारचा चेंदामेंदा झाला आहे .या भयानक  दुर्घटनेत सुदैवाने बापलेक बालंबाल बचावल्याने, श्री.  झोपे कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मुख्य रस्त्याच्या मध्यभागी श्रीरामलिला बंगल्यासमोर पिंपळाचा मोठा वृक्ष आहे.
जुना असलेल्या या वृक्षाच्या बुंध्याजवळ सनत झोपे यांनी त्यांची मोटार उभी करतात, त्यांनी नियमित पणे रात्री गाडी उभी केली आणि ते त्यांच्या बंगल्याचे प्रवेशद्वार उघडण्यासाठी तीन वर्षाच्या मुलाला घेऊन कारमधून उतरले.NASHIK College Road
ते  बंगल्याचे गेट सरकावून आत जात नाही भयानक तोच मोठा आवाज झाला आणि परिसरात सर्वत्र अंधार पसरला. निवेदिता हॉस्पिटल रोड जवळील या पिंपळाच्या झाडाची निम्मी बाजू पुर्णपणे मोटारीवर कोसळली होती. बुंध्यापासून वाढलेली मोठी फांदी कारवर आदळल्याने कारचा चक्काचुर झाला आहे. सुदैवाने गाडीत कोणीच नव्हते तीमुळे काही दुर्दैवी घडले नाही. बचाव पथक व नागरिक घटनास्थळी त्वरित आले होते. NASHIK College Road
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.