नाशिक : डर चित्रपटात जसा विक्षिप्त तरुण त्यातील नायिकेला त्रास देतो, तसा प्रकार कॉलेज रोड परिसारत घडली आहे. विशेष असे की हा प्रकार घडला असून त्यामुळे मुलींची सुरक्षा व्यवस्था पुन्हा धोक्यात आली आहे.
या प्रकरणात या तरुणाने अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. ती घाबरून जोरात चालू लागली तेव्हा भररस्त्यात तिचा टी शर्ट पकडून चाकूचा धाक दाखवत मैत्री करते की नाही तुझ्याशी मला लग्न करायचे अाहे, असे सांगत एका विकृत युवकाने या मुली भर रस्त्यात लज्जा उत्पन्न होईल असे विनयभंग केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता कॉलेजरोडवर घडला आहे. या सर्किट आशिक विरोधात सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. घटनेनंतर हा सर्किट युवक फरार झाला.

पोलिसांत पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी सकाळी महाविद्यालयातून घरी येत असताना तोड ओळख असलेला संशयित विशाल तिवर (रा. अशोकनगर, सातपूर) याने तिचा पाठलाग सुरु केला.
त्याने मुलीचे टी-शर्ट पकडून जवळ ओढले होते ‘माझ्याशी मैत्री कर, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. तू हो म्हणाली नाही तर तुझ्या घरच्यांची बदनामी करेल. मारून टाकेल. माझ्याकडे हत्यार आहे’ असे म्हणत खिशातून चाकू काढला आणि तिला धमकी दिली आहे. ही मुलगी इतकी भेदरली होती की तिला काय करावे ते सुचत नव्हते तिच्या सोबत असलेल्या मुलीनी तिला घरी नेले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपनिरीक्षक अादिनाथ मोरे यांचे पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयिताचा शोध घेतला, मात्र तो मिळाला नाही. संशयित युवकाच्या विरोधात लहान मुलांचे लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा (पोक्सो) तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.