ylliX - Online Advertising Network

Collector Nashik Coronavirus Crisis पंधरा दिवस महत्त्वाचे – जिल्हाधिकारी: संचारबंदीचे पालन करा

नाशिक: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नाशिककरांच्या दृष्टीने येणारे पंधरा दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. नाशिककरांनी घरीच थांबून संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे. Collector Nashik Coronavirus Crisis

मालेगावमधील दाट लोकवस्तीमुळे करोनाचा फैलाव होण्याचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांनी परदेश, परराज्य अथवा पर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची माहिती तात्काळ प्रशासनास देण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

जिल्ह्यात 28 मार्च रोजी पहिला करोना बाधित रुग्ण आढळून आला त्यानंतर आजपर्यंत ती संख्या 13 वर गेली आह. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी सतर्क राहून घरातच थांबणे गरजेचे आहे. यासाठी जीवनावश्यक किंवा अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गेल्यावर गर्दी करणे, विनाकारण लॉकडाऊन कालावधीत फिरणे या गोष्टी टाळाव्यात.

या विषाणूंचा प्रादुर्भाव आपल्याकडे उशिराने झाल्यामुळे अजून देखील सर्व परिस्थिती आपल्या नियंत्रणात आहे. या आपत्कालीन परिस्थितीमध्ये महसूल, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद, महानगरपालिका यासर्व यंत्रणा अतिशय उत्कृष्टपणे उपायोजना करून आपली जबाबदारी पार पाडीत आहेत.

या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. त्याचप्रमाणे विशेष करून मालेगावमध्ये पावरलूमचे प्रमाण अधिक असल्याने अनेकांची फुप्फुसांची क्षमता कमी आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी टीबीचे पेशंट जास्त आहेत, तेथे या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगची सर्व नियम पाळणे अत्यावश्यक आहे.

जे कोणी संचारबंदी कालावधीत नियमांचा भंग करेल त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे या सर्व परिस्थितीतून सुखरूपपणे बाहेर पडण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.