ylliX - Online Advertising Network

सोयाबीनवर आयात शुल्क वाढवावे : मुख्यमंत्री

राज्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी सोयाबीनवर आयात शुल्क वाढवावे – मुख्यमंत्र्यांची विनंती
मुंबई : २०१६ या वर्षात झालेला समाधानकारक पावसामुळे राज्यात या हंगामात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन वाढल्यामुळे दर घसरण्याचे चिन्ह आहेत. त्यादृष्टीने राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने सोयाबीनवरील आयात शुल्क वाढवावे, अशी विनंती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली आहे.

आणि जलयुक्त सारख्या योजनेमुळे वाढलेली पाण्याची उपलब्धता यामुळे सोयाबीनचे उत्पादन मागील वर्षापेक्षा तीन पटीने अधिक होणे अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यात सोयाबीनचे दर घसरण्याची शक्यता लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री जेटली यांना लिहिलेल्या पत्रात अशी मागणी केली आहे.

अशा परिस्थितीत अलीकडेच मोदी सरकारने 2016-17 या वर्षांसाठीच्या जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीवर राज्य शासनाने सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजनाही लवकरच केल्या जातील अशी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोयाबीनवरील आयात शुल्क वाढविल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.