ढगाळ हवामान, राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस, शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ

अवकाळी पाऊस झाला तर अनेक पिकांचे होणार मोठे नुकसान

नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सोमवारी पहाटेपासूनच ढगाळ वातावरण झाले आहे. सकाळपासून सूर्य दर्शन झालेले नाही.या वातावरणामुळे द्राक्ष शेतकरी चिंतेत सापडले आहे. हवामान विभागानुसार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर स्कायमेट ने पावसाचा अंदाज वर्तवला नसला तरी ढगाळ पुढील काही हवामान राहील असा अंदाज वर्तवला आहे. अवकाळी पाऊस झाला तर  शेतकरी वर्गाला मोठ्या  नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. स्कायमेट नुसार सरासरी १३ अंश सेल्सिअस तपमान होते. नाशिक परिसरात हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी पावसाने अचानक हजेरी लावली आहे. त्यामुळे रेनकोट की स्वेटर घ्यावे अशी स्थिती नागरिकांची झाली. अचानक आलेल्या पावनासाने जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस :

राज्यात हिवाळ्यात अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या  हलक्या सरी पडल्या आहेत. त्यामुळे वातावरण बदलले आहेत. यामध्ये खानदेशातील जळगाव जिल्ह्यात काही  ठिकाणी थोड्या प्रमाणात सरी पडल्या आहे. तर मराठवाड्यात औरंगाबाद येथे थोडा पाऊस झाला आहे.मात्र नाशिक प्रमाणे पुणे येथे सुद्धा ढगाला वातवरण तयार झाले आहे.

मुंबईत अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर येथे तुरळक सरी पडल्या आहेत. कल्याण-डोंबिवलीतही पावसाचं वातावरण दिसून येत आहे.नवी मुंबईतही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. कोकण भागातील रायगड जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा तर  पनवेल, रोहा भागात रिमझिम सरी आणि पेण, वडखळ, परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे.राज्यात अनेक ठिकाणी अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या वातावरणामुळे अनके ठिकाणी विषाणूजन्य रोग वाढण्याची शक्यता आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.