ylliX - Online Advertising Network

छ. शिवाजी स्टेडियम : चेंबरमध्ये गुदमरून सफाई कामगाराचा मृत्यू

नाशकात आठ दिवसातील सफाई कर्मचाऱ्याचा चेंबरमध्ये गुदमरून मृत्यू होण्याची घटना दुसऱ्यांदा घडली आहे. #NashikOnWeb

नाशिक शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडिअम या मैदानातील चेंबरची साफसफाई करताना गुदमरून सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अशोक रामपसे (45, रा. अवधुतवाडी, दिंडोरीरोड, पंचवटी) असे या मृत सफाई कामगाराचे नाव आहे. सकाळी 11 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. Cleaning Staff death Nashik City March 2019

एका कामगारास बाहेर लढण्यासाठी चेंबरमध्ये ते गेले असता त्यांचाच ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पप्पू सकट या ठेकेदारांची चार-पाच माणसं शिवाजी स्टेडिअममध्ये यशवंत व्यायामशाळेच्या संरक्षण भिंतीलगतच्या चेंबर साफसफाईसाठी करत होते.

एक सफाई कामगार चेंबरमध्ये उतरला असता, आतील वायुमुळे त्याला त्रास होऊ लागल्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी रामपसे चेंबरमध्ये उतरले. आधी उतरलेल्या सफाई कामगाराला बाहेर काढण्यास मदत करतानाच त्यांचा विषारी वायुमुळे ऑक्सिजनच्या अभावी गुदमरून मृत्यु झाला.

भद्रकाली पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

आठ दिवसांपूर्वीच वडाळा रोड येथे अनधिकृत गोठयांमुळे होणाऱ्या चेंबर चोकिंग काढताना असाच एका सफाई कामगाराचा मृत्यू झाला होता.

Cleaning Staff death Nashik City March 2019
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.