स्तुत्य : स्वच्छ नाशिकसाठी गोरक्षनगर मित्र मंडळाचे महास्वच्छता अभियान

साथीचे आजार दूर ठेवण्यासोबतच स्वच्छ भारत अभियान २०१९ साठी केली तयारी

नाशिक : दिवसेंदिवस डेंग्यू, मलेरिया तसेच स्वाईन फ्लू सारखे वाढत चाललेले आजार दूर ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत २०१९ मध्ये होणाऱ्या सर्वेक्षणात नाशिक शहरास टॉप 10 मध्ये अंकाने या उद्देशाने रविवारी (दि. 21) गोरक्षनगर सांस्कृतिक मित्र मंडळातर्फे दिंडोरी रोड येथे महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली. Clean Nashik Green City Swachh Bharat Abhiyan GorakshNagar Mitra Mandal

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब सानप तसेच मेरी म्हसरुळ परिसरातील डॉ. साकळे, डॉ.रविकिरण निकम, डॉ. तोरणे, डॉ. देशपांडे, डॉ. जायभावे आदी उपस्थित होते.

Clean Nashik Green City Swachh Bharat Abhiyan GorakshNagar Mitra Mandal

केंद्रशासनातर्फे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत देशातील स्वच्छ व प्रदूषणमुक्त शहरांसाठी मागील वर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये आपल्या नाशिक शहराचा क्रमांक पहिल्या दहा मध्ये आणण्यासाठी महानगरपालिकेतर्फे स्वच्छतेच्या बाबतीत विविध पातळ्यांवर भरपूर प्रयत्न करण्यात आले होते. यात गोरक्षनगर सांस्कृतिक मित्र मंडळातर्फे देखील गेल्या वर्षभरापासून अनेक स्वच्छता अभियान राबवून, या प्रयत्नांमध्ये खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, अपुऱ्या लोकसहभागामुळे ह्यावेळेस देखील नाशिक शहर या स्पर्धेमध्ये बरेच मागे पडल्याचे चित्र दिसत आहे.

Clean Nashik Green City Swachh Bharat Abhiyan GorakshNagar Mitra Mandal

त्यामुळेच या स्वच्छता अभियानामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा या हेतूने हे अभियान सुरु करण्यात आले. या पार्श्वभूमीवर गोरक्षनगर वासीयांतर्फे हाती घेतलेला हा उपक्रम, समस्त नाशिककरांपुढे निश्चितच एक आदर्श निर्माण करणारा तसेच “लोकसहभागाची चळवळ” सुरू करणारा असा ठरणार आहे. Clean Nashik Green City Swachh Bharat Abhiyan GorakshNagar Mitra Mandal

यावेळी आमदार बाळासाहेब सानप आणि उपस्थित डॉक्टरांनी देखील मार्गदर्शन करतांना, डेंग्यू, मलेरिया सारख्या साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाच्या काळजी बद्दल माहिती सांगितली. तसेच स्वच्छतेचे महत्व विषद केले.

Clean Nashik Green City Swachh Bharat Abhiyan GorakshNagar Mitra Mandal

या अभियानामध्ये संपूर्ण गोरक्षनगरवासीय, तसेच परिसरातील विविध सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोरक्षनगर सांस्कृतिक मित्र मंडळाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

“स्वच्छतेतून आरोग्य” हा विचार रुजवण्यासाठी सदर उपक्रम महिन्यातून किमान एक दिवस राबविण्यात येणार आहे. यावेळी मंडळातर्फे ‘एक परिसर – एक रविवार, स्वच्छतेसाठी गोरक्षनगर सांस्कृतिक मित्र मंडळ आहे तयार’ असा नारा देखील देण्यात आला. – प्रवीण जाधव, अध्यक्ष, गोरक्षनगर मंडळ

Clean Nashik Green City Swachh Bharat Abhiyan GorakshNagar Mitra Mandal
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.