ylliX - Online Advertising Network

बंद लिफ्टचा मातेला फटका पोर्च मध्येच झाली प्रसूती

जिल्हा रुग्णालयाचा पुन्हा गलथान कारभार

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील गलथान कारभाराचा पुन्हा एकदा फटका नागरिकांना बसला आहे. यामध्ये मुख्य लिफ्ट बंद असल्याने गर्भवती महिला पोर्चमध्येच प्रसूती झाल्याची घटना रविवारी (दि़१६) सकाळी घडली आहे. जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व आहार विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी तत्काळ आडोसा करून गर्भवतीची मदत केली़ असून,  या महिलेने गोंडस बाळास जन्म दिला असून दोघेही सुखरूप आहेत़. या अगोदर मुलांचे इन्क्युबेटर, मृत बालक परिसरात मिळणे असे अनेक प्रकार उघड झाले होते.

Mother nashik onweb
Mother’s day, Mother, Baby, Infant, Motherhood, Love, Innocence

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार,  निफाड येथील खांडगाव गावातील सुगंधा भावराव जाधव (२६) या गर्भवती महिलेस रविवारी सकाळी शिंपी टाकळी येथून १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणले होते. त्या स्ट्रेचरवर असतानाच सुगंधा यांना प्रसूती कळा सुरू झाल्यान होत्या, त्यांना  तत्काळ पहिल्या मजल्यावरील प्रसुती कक्षात दाखल करणे गरजेचे होते़ त्यांना पहिल्या मजल्यावर नेण्यासाठी लिफ्टजवळ नेले होते, पोर्चमधील दोन्ही लिफ्ट बंद होत्या़ दरम्यान, याचवेळी जाधव यांची प्रसूती झाली व त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला़

जारील आपत्कालीन कक्षातील परिचारीकांना आवाज देऊन या ठिकाणी असलेल्या पुरुषांना बाहेर काढून पोर्चचे दोन्ही गेट बंद करून बाळंतिणीस आडोसा केला़ यावेळी परिचारिकांनी गोंडस बाळ व जाधव यांच्यावर उपचार केले़ तर वॉर्डबॉय यांनी झोळी करून जाधव यांना प्रसूतीकक्षात दाखल केले़ जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व धावपळ करणा-या कांबळे यांचे जाधव यांनी आभार मानले़ आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.