ylliX - Online Advertising Network

नाशिकमधील दरोड्यातील संशयितांच्या दुचाकी सापडल्या

शुक्रवारी (दि. १४) नाशिक शहराला हादरवून सोडणाऱ्या उंटवाडी येथील मूत्थूट फायनान्सच्या कार्यालयावरील दरोड्यातील संशयितांच्या दुचाकी पेठ रस्त्यावरील रामशेज किल्ल्याजवळ मिळून आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दरोडेखोर दरोडा घालण्यासाठी तीन दुचाकीवरून आले आणि फरार झाले होते. त्यानुसार आता या तीन दुचाकी मिळून आल्याने तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आले आहेत. city police captured three bikes robbery dacoity attempt nashik untawadi muthoot finance

या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या धक्कादायक घटनेत गोळीबारात कार्यालयातील शाजू सॅम्युअल (32) या कर्मचाऱ्याला पाच गोळ्या लागून जागीच मृत्यू झाला होता.

या तीन दुचाकी बजाज कंपनीच्या पल्सर असून पोलिसांनी त्या हस्तगत केल्या आहेत. काही स्थानिकांनी काल दुपारपासून येथे तीन दुचाकी उभ्या आल्याची माहिती पोलिसांना आज (दि. १५) दिली.

घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला असून यातून काही धागेदोरे मिळतात का याचाही तपास करून कारवाई वेगाने सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सॅम्युअल यांच्या शरीरात एकूण पाच गोळ्या सापडल्या असून यावरून हल्ल्याची तीव्रता समजून येते. एमएस सॅम्युअल हे मूळचे केरळ येथील असून सध्या त्यांचे वास्तव्य नवी मुंबईच्या नेरळ परिसरात होते. त्यांच्या मागे पत्नी, दहा महिन्याचा मुलगा आणि विधवा आई आहे.

अशा घटना स्थानिक मदतीशिवाय घडू शकत नाही : नांगरे पाटील

नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले की, या प्रकरणात आम्ही दोन संशयितांना प्राथमिक तपासासाठी ताब्यात घेतले असून घटनास्थळावरील सीसीटीव्ही मध्ये दरोडेखोरांचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत. अशा प्रकारच्या घटना स्थानिक मदतीशिवाय घडू शकत नाही असे म्हणताना नांगरे पाटील यांनी लवकरच आम्ही या गुन्ह्याचा छडा लावू असे विश्वास व्यक्त केला आहे.

कार्यालयातील थरार :

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोर तीन दुचाकीवरून कंपनीचे कार्यालय असलेल्या इमारतीजवळ आले. सकाळी साडे अकराच्या सुमारास ते त्यांच्याकडे असेल्या बंदुका घेऊन ते कार्यालयात शिरले. कार्यालयातील सात कर्मचारी आणि तेथील काही ग्राहकांना त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून एका बाजूला नेले. त्यांनी सॅम्युअल आणि कैलाश जयन (२५) यांना कार्यालयाच्या मागील बाजूस बघताच त्यांनाही खेचून पुढे आणले. याचवेळी सॅम्युअल यांनी प्रसंगाचे अवधान दाखवत जवळील अलार्मचे बटन दाबले.

सम्युअल यांनी चोरांच्या तावडीतून सुटत शाखेचे व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे (६४) यांच्या मदतीला धावला. देशपांडे यांच्याकडे असलेल्या तिजोरीच्या (स्ट्रॉंग रूम) चाव्या मिळाव्यात म्हणून बंदुकीच्या मागच्या बाजूने देशपांडे यांच्या डोक्यावर प्रहार केले जात होते.

city police captured three bikes robbery dacoity attempt nashik untawadi muthoot finance
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.