ylliX - Online Advertising Network

मनपाचे तक्रार निवारण अॅप; ६९ टक्के नाशिककर समाधानी!

नाशिक: आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिक महापालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर महापालिकेच्या सुविध नागरी सेवा लोकाभिमुख होण्याकडे लक्ष केंद्रित केले असून एनएमसी ई कनेक्ट या ॲपच्या माध्यमातून नवीन तक्रार निवारण प्रणाली द्वारे गेल्या १५ दिवसात विविध विभागांशी संबंधित ११०९ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८५१ तक्रारी निकाली निघाल्या आहेत तर २५८ तक्रारी प्रलंबित आहेत. citizen grievance systems nmc econnect nashikkkars positive feedback tukaram mundhe

आतापर्यंत सुमारे दहा हजार नागरिकांनी हे ‘एनएमसी ई-कनेक्ट‘ अॅप मोबाइलवर डाऊनलोड केले असून याबद्दल ६९ टक्के नाशिककरांनी समाधान व्यक्त केले आहे. ॲपबाबत १७ टक्के नागरीकांना प्रतिसाद नोंदविला आहे.

हे आहेत तक्रार निवारण कार्यप्रणालीमध्ये आमूलाग्र बदल

  • नवीन कार्यप्रणालीमध्ये तक्रारदारास प्रथमत: नोंदणी करावी लागणार,
  • एकदा नोंदणी झाल्यानंतर तक्रारदाराचे लॉगिन आयडी व पासवर्डद्वारे लॉगिन झाल्यानंतर तक्रार नोंदणी करता येणार,
  • त्यामुळे तक्रारदाराने केलेल्या सर्व तक्रारींचा लॉग मेंटेन होणार आहे.
  • तक्रारकर्त्याने ऑनलाइन तक्रार नोंदविल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकार्याला २४ तासांत दखल घेणे क्रमप्राप्त.
  • दखल घेतली न गेल्यास अधिकाऱ्याला करणे दाखवा नोटीस.
  • त्याआधारेच अधिकाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन केले जाणार.

तक्रार निवारण कार्यप्रणालीतील सुधारणांमुळे नागरिकांच्या तक्रारींचे सुलभरीत्या निराकरण होण्यास मदत होणार आहे.  आहे. यापूर्वीच्या तक्रार प्रणालीत तक्रारी या संबंधित कर्मचाऱ्यांकडे निराकरण करण्याकामी वर्ग व्हायच्या, तथापि नवीन कार्यप्रणालीनुसार तक्रार निराकरण करण्याची सर्व जबाबदारी संबंधित विभागीय अधिकारी व संबंधित खातेप्रमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

citizen grievance systems nmc econnect nashikkkars positive feedback tukaram mundhe

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Connect with Us on WhatsApp : 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.