नाशिक महानगर पालिकेच्या तक्रार निवारण कार्यप्रणाली अद्यतनित, तक्रारीचे होणार सुलभरित्या निराकरण

तक्रार निवारण कार्यप्रणाली संकेतस्थळ व मोबाईल ॲप)
Citizen Grievance Systems

नाशिक महानगरपालिकेत ऑनलाईन तक्रार निवारण कार्यप्रणाली सन  २०१४ साली सुरु करण्यात आली आहे व त्याचे मोबाईल ॲप्लिकेशन सन २०१५ साली सुरु करण्यात आले. ऑनलाईन तक्रार निवारण कार्यप्रणाली व मोबाईल ॲपद्वारे वार्षिक सरासरी 25,000 ते 30,000 इतक्या तक्रारी मनपास प्राप्त होतात.

तक्रार निवारण कार्यप्रणालीत आधिक सुलभता व अचुकता येवुन तक्रारींचे परिणामकारक निवारण करण्याकरीता ऑनलाईन तक्रार निवारण कार्यप्रणालीत आमुलाग्र बदल करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचे  सुलभरित्या निराकरण होण्यास मदत होणार आहे.

 • नवीन कार्यप्रणालीमध्ये तक्रारदारास प्रथमत: रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. ही प्रक्रिया तक्रारदारास एकदाच करावयाची आहे. एकदा रजिस्ट्रेशन झालेनंतर तक्रारदारास त्याचा प्राप्त लॉगीन आय.डी. व पासवर्डद्वारे लॉगीन झाल्यानंतर तक्रार रजिस्टर्ड करता येणार आहे. त्यामुळे तक्रारदाराने केलेल्या सर्व तक्रारींचा लॉग मेंटेन होणार आहे.
 • यापुर्वी तक्रारी या संबंधित कर्मचा-यांकडे निराकरण करणेकामी वर्ग व्हायच्या, तथापी नवीन कार्यप्रणालीनुसार तक्रार निराकरण करण्याची सर्व जबाबदारी संबंधित विभागिय अधिकारी व संबंधित खातेप्रमुख यांचेवर सोपविण्यात आली आहे.

3) तक्रार रजिस्टर्ड झाल्यानंतर संबंधित अधिका-याने तक्रार २४ तासांचे आंत बघुन कार्यवाही सुरु करावयाची आहे व तक्रार निराकरण करावयाचा कालावधी ७ दिवस इतका निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर तक्रारी पुढील वरिष्ठ् अधिका-यांकडे वर्ग होणार आहे. २४ तासांमध्ये तक्रार ओपन करुन कार्यवाही सुरु न झाल्यास तक्रार वरिष्ठ् अधिका-यांकडे वर्ग होईल, तक्रार वरिष्ठ् अधिका-यास वर्ग झाल्यास संबंधित अधिका-यास सिस्टीमद्वारे ऑटोमॅटीक कारणे दाखवा नोटीस प्राप्त् होणार आहे. त्यामुळे संबंधित अधिका-यांना तक्रारीचे निराकरण विहीत कालावधीत करावे लागणार आहे.

 • यापुर्वी नागरिकांना जुन्या तक्रार निवारण कार्यप्रणालीमध्ये तक्रारीचा प्रकार तसेच सदर तक्रार ज्या विभागाशी संबंधित आहे तो विभाग Select करावा लागत होता, तथापी नवीन कार्यप्रणालीमध्ये तक्रारीचा प्रकार Select केल्यानंतर विभाग Select करण्याची गरज नसुन ती तक्रार आपोआप संबंधित विभागांकडे वर्ग होणार आहे. त्यामुळे नागरिकांना तक्रार ही अत्यंत कमी स्टेपमध्ये दाखल करता येणार आहे.
 • संबंधित विभागाने तक्रारीचे निराकरण करुन ती क्लोज केल्यानंतर, नागरिक जेव्हा दुसरी तक्रार रजिस्टर्ड करतील त्यावेळेस यापुर्वी क्लोज केलेल्या तक्रारींकरीता नागरिकांना रेटींग तसेच फिडबॅक देण्याची सुविधा नवीन कार्यप्रणालीत उपलब्ध् करुन देण्यात आलेली आहे. सदर रेटींग हे त्या तक्रार निवारण करणा-या विभागास व अधिका-यांना प्राप्त् होणार आहे व प्राप्त झालेल्या रेटींगचा आढावा वेळोवेळी वरिष्ठ् स्तरावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधितांचा Performance कसा आहे याबाबतची नोंद घेण्यात येणार आहे.
 • यापुर्वीच्या तक्रार निवारण कार्यप्रणालीमध्ये समाविष्ठ् असलेले Reopen चे Function कायम असुन नागरिकांचे समाधान न झाल्यास Close केलेली तक्रार नागरिकांना Reopen करता येणार आहे. तक्रार ही Reopen झालेनंतर तक्रार वरिष्ठ् अधिका-याकडे वर्ग होऊन ज्या अधिका-याने तक्रारीचे निराकरण योग्य प्रकारे न करता क्लोज केले आहे, त्यांना आपोआप कारणे दाखवा नोटीस तयार होणार आहे.

अशारितीने मनपाने ऑनलाईन तक्रार निवारण कार्यप्रणालीत आमुलाग्र बदल केलेला असुन त्यामुळे मा. आयुक्तांना प्रशासकीयदृष्टया तक्रारींवर तसेच कामकाजावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. तसेच मनपास नागरीकांच्या तक्रारींवर अधिक परिणामकारक कार्यवाही करणे सदर कार्यप्रणालीमुळे सहज शक्य होणार आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

24 thoughts on “नाशिक महानगर पालिकेच्या तक्रार निवारण कार्यप्रणाली अद्यतनित, तक्रारीचे होणार सुलभरित्या निराकरण

 1. माझ्या घरासमोर नगरपालिकेने झाड तोडलेले टाकले 3 ते 4 महिने त्या झाडाचे फांदी उचलून नेले नाही तरी ती घाण उचलून नेने मलेरिया डेंगू होत आहे घराच्या समोरचे व बाजूला टाकलेले फांदी उचलून न्यावे ही विनंती

  1. कुत्र्याचा भयकंर त्रास होत आहै.तो आमच्या बिल्डींग मध्ये सारखा येऊनबसतो त्याचे रक्त गळते आहे. कृपया लवकरात लवकर कारवाही करावी …..Rajmudra appt’near sale tax office ,hanuman nagar phatardi phata.nasik ..10

 2. The street light is not working for a long time.Unsafe to move in dark.
  Address Jagtap mala near Ranjit aashram
  Nasik road

 3. हनुमान नगर, राजराजेश्वरी मंगल कार्यालय शेजारी, जेलरोड, नाशिक रोड ४२२१०१
  प्रभाग क्रमांक १८
  गेली ७ दिवसा पासून आमच्या प्रभागत शेवाळ आलेले पाणी सोडन्यात येत आहे..असे पाणी की जे पिण्या योग्य नाही…
  माझ्या कुटुंबातील सर्व जन आजारी पडले ते पाणी पिल्यामुळे
  मि त्या पाण्याचा आपणास फ़ोटो अटैच करत आहे.कृपया आपण तो बघवा आणि लवकरात लवकर करवाई करावी ही नम्र विनंती….

  (एक दक्ष नागरिक)

  1. नमस्कार सर, आपलं म्हणल्याप्रमाणे इथे फोटोज दिसत नाहीयेत.. कृपया खालील लिंक वर क्लिक करून महापालिकेचे अॅप डाउनलोड करून त्यावर प्रभाग निवडून तक्रार दाखल करण्याचे माही तुम्हाला सुचवत आहोत. http://nashikonweb.com/citizen-grievance-systems-nashik-municipal-corporation-nmc-e-connect/

  2. गोरक्षनगर ,मेरी म्हसरूळ परीसरात घंटागाडी आठवड्यात 2दिवस येत आहे ते पन काही वेळ काळ नाहीत घरात कीती दिवस कचरा ठेवायचा लोकांनी त्वरीत काही उपाय योजना करण्यात यावी .

   1. माझ्या घरा जवळ 4 ते 5 मोकाट कुत्रे रोज लोकांच्या अंगावर धावून जातात. मोटर सायकल वाले तर पडता की काय असं वाटत. तरी लवकरात लवकर या मोकाट कुत्र्यांना पकडावे ही विनंती.
    पत्ता : कमला पार्क रो हाऊस फर्नांडिस वाडी समोर, जय भवानी रोड नाशिक रोड

 4. कोणार्क नगर मध्ये सातत्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात कमी पाणी येत आहे

 5. इंदिरा नगर पांडव नगरी गुरु गोविंद कॉलेज च्या पाठी मागे पांडव नगरी आम्ही पांडव नगरी चे रहवासी आहोत आमच्या बाजूची सोसायटी लक्ष्मण B विंग ड्रेनेज च पाणी गेल्या पाच ते सहा वर्षा पासून ड्रेनेज च पाणी उघड्यावर पाणी वाहते त्या ड्रेनेज च्या पाण्यानी अतिशय घाण दुर्गंधी परिसरात पसरली आहे त्या सांड पाण्यानी मच्छरानच साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले आहे त्याच्या मुळे ताप डेंगू मलेरिया अश्या आजाराला आमंत्रण आमच्या घरातले त्या ड्रेनेज च्या पाण्यामुळे आजारी पडले आहेत ,आम्ही आधी खूप वेळा सोसायटी च्या लोकांना तक्रार केली पण कोणी दखल घेत नाही आणि त्या सोसायटी मध्ये सर्व भाडेतत्त्वावर राहणारे लोक आहेत त्यामुळे घरमालक पण आणि भाडेकरूपण काही दखल घेत नाही आम्ही इथल्या नागरिकांनि खूप वेळेला महानगरपालिका मध्ये तक्रार नोंदवली आहे पण अद्याप आम्हाला कुठलीही प्रकारची मदत आम्हला नाही मिळाली त्या ड्रेनेज च्या पाण्यामुळे 3 ते 4 सोसायटीना त्रास होत आहे तरीही नाशिक महानगरपालिका नि तात्काळ दखल घ्यावी

  1. आम्ही आपला प्रश्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू. त्याची दखल नक्कीच घेतली जाईल.

 6. वैभव रो हाउस पेठ रोड भगवान बाबा नगर says:

  पेठ रोड भगवान बाबा नगर वैभव रो हाऊस आमच्या रो, हाउस मध्ये एक वर्ष झले आहे तरी नळ कनेक्शन दिलेले नाही तरी कुरपा कसरून आमच्या पिण्याच्या पणायचा प्रशन सोडवावा ही नम्र विनंती

 7. वैभव रो हाउस पेठ रोड भगवान बाबा नगर says:

  पाणी नही नळ कनेक्शन पाहिजे

 8. सन्मा महोदय,
  विषय :- काॅलनी रोडचे नवीन अपूर्ण काम
  प्लॅट नं. १३, कैलास नगर, यमुना एनक्लेव शेजारी कमोद पेट्रोल पंपा मागे पंचवटी, नाशिक – ४२२००३.
  सध्या काॅलनी रोडचे काम चालू असुन ते फक्त प्लॅट नं. ११ पर्यत केले आहे ते पुढे प्लॅट नं.१४ पर्यंत करणेत यावे ही विनंती.

  आपला विश्वासू,

  अ.सु.भावसार

 9. महोदय, आम्ही आमच्या इमारतीत झालेल्या अतिक्रमणा बाबत तक्रार अर्ज करुन 3 महिने उलटुन सुद्धा अजुन काहिच कारवाई झाली नाही. याचा अर्थ काय समजावा आम्ही ….?!
  तरि आपण आपले कर्तव्य निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडावे ..
  हि अपेक्षा.
  add :-VASUDEVANAND Scty. Gorewadi Nasik road NASHIK

 10. महोदय,
  खोडे नगर, वडाळा शिवार, मस्जित हसन जवळ चेंबर तुंबले असून सगळा मल जल रस्त्यात वाहत असून नागरिकांना याचा त्रास होत आहे.
  कृपया लवकरात लवकर चेंबर ब्लॉकेज काढावे.
  कळावे.
  (दक्ष नागरिक)

 11. कॉर्पोरेशन चा पाण्याचा पाइप फुटला आहे माझ्या घरा जवळ. खूप पाणी वाया जाते आहे. कृपया लवकर रिपैर करणे.

 12. सुप्रिम लॅब , अशोका मार्ग नाशिक या ठिकाणी मी दि.8 एप्रिल ला swab दिला असता, 4 दिवस झाले तरी माझा रिपोर्ट दिला नाही त्याशिवाय डॉ. एडमिट करून घेत नाही . या दरम्यान मला उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. मी प्रत्यक्ष लॅबला गेलो असता मला माझी फी परत केली पण 4 दिवस वाया गेले त्याचे काहीच नाही का? उद्या कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले तर उपचाराला उशीर होईल त्याचे काय? तरी माझी विनंती की सदर लॅब ची मान्यता रद्द करावी. लोकांच्या भावनांशी व जीवाशी आशा पैसा कमावण्याच्या धंद्याने खेळू नये.

 13. नाशिक शहरातील काही खाजगी शाळा कोरोना संकटाचा विचार करता फी मध्ये सवलती देत आहेत तर काही शाळा एक रुपया देखील कमी करत नसून आज सेंट फ्रान्सिस शाळेने पूर्ण फी न भरलेल्या चिमुकल्या मुलांचा निकाल राखून ठेवला आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या, कामं सुटली संसार उघड्यावर पडले तरी आपल्या महानगर पालिकेने या संवेदनशील घटनेची दाखल5घेत फी सवलती बद्दल काही तरी नियमावली त्वरित जाहीर करावी ही कळकळीची नम्र विनंती.

 14. आश्रय हाउसिंग सोसायटी भाऊसाहेब हिरे नगर प्लॉट न49जवळ गटारी चे झाकण उघडले आहे पावसाळ्यात अपघात होऊ शकतो तरी झाकण निट बसून मिळावे
  शामकांत कुंवर 9823093801

 15. सर , मी विनंती करतो की आमच्या वाड्यात रस्ता नसल्याने आम्हाला खूप अडचणी येत आहेत. सर मी मखमलाबाद गाव पिंगळे गली/ पिंगळे वाडा राहत आहे मला नाही तर इथे राहणाऱ्या लोकांना अडचणी येत आहेत, पण काही लोकांमुळे आम्हाला रस्ता करुन देत नाही. हा रस्ता सिटी सर्व्हे रेकॉर्ड मंजुर आहे . तरीही रस्ता करुन देण्यात आला नाही .हा वाडा खुप जुना आहे व मातीचे बांधकाम केले आहे आम्हाला फक्त जणं येणं साठी एक छोटीशी बोळं आहे. आम्ही अतिक्रमण विभाग अर्ज केला आहे पण ते म्हणाले की नगररचना विभागाचे अधिकारी कडे अर्ज करा असे सांगितले आहे म्हणून मी तिथं पण आज केला पण त्यांनी अतिक्रमण विभागाला अर्ज करावा असे सांगितले म्हणून मी विनंती करतो की आमच्या वाड्यात रस्ता करुन देण्यात यावा व या रस्ता नसल्यानेच आम्हाला खूप अडचणी येतात.असे अनेक घरे आहेत असे त्यांना अडचणी येतात पण ते अर्ज करायला घाबरतात. कारण आम्हाला त्यांच्या घरासमोरू जायला लागते. फक्त एक बोळ आहे.
  आम्ही आमच्या नगरसेवकांना पण सांगितले ते म्हणाले की आम्ही रस्ता करुन देतो असे आम्हाला आजपर्यंत जेवढं नगरसेवक झाले त्यांनी असे सांगितले.पण अजून रस्ता झाला नाही ‌. म्हणून मी विनंती करतो की आमच्या घरासाठी रस्ता करुन देण्यात यावं ही विनंती कारण आमचे घर हे मातीचे आहे असे अनेक घरे आहेत पावसाळ्यात घराची माती पडते. म्हणून मी विनंती करतो आहे. उद्या काही झाले तर जबाबदारी ही नाशिक महापालिकाची व प्रशासनाची राहील. म्हणून लवकरत लवकर रस्ता करुन देण्यात यावा ही विनंती . ‌ आपला विश्वासू
  पिंगळेे

 16. प्रभाग क्रमांक 6 (ब )मधील पिंगळे वाडाचा रस्ता करुन देण्यात यावा . कारण रस्ता नसल्याने आम्हाला खूप अडचणी येत आहेत . आम्हाला येणं जाणं साठी फक्त एक छोटीशी बोळं आहे व हा रस्ता मंजुर असुन अजून झालेल्या नाही तो लवकरत लवकर करुन देण्यात यावा ही विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.