Smart Nashik ॲपचे नावांत बदल NMC e-Connect, घंटागाडीचा मिळणार ‘अलर्ट’

नाशिक : डॉ. प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या ‘स्मार्ट ॲप’मध्ये सुधारणा करत ‘एनएमसी ई-कनेक्ट’ या नव्या नावाने मोबाइल ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नाशिकच्या नागरिकांच्या तक्रार निवारण करण्याच्या प्रणालीत मोठे बदल केले असून यात अनेक नवे फीचर्स जोडण्यात आले आहेत. Citizen Grievance Systems Nashik Municipal corporation NMC e-Connect

नागरिकांना तक्रार करताना विचार करावा लागू नये या तत्वानुसार याची मांडणी करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना तुकाराम मुंडे यांनी अशाच प्रकारे NMMC e-connect या नावाने ॲपच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे.

सर्वप्रथम नाशिक मनपाने स्मार्ट नाशिक ॲपच्या नावामध्ये बदल केला असुन NMC e-Connect नावाने सदर ॲपचे Update Play Store वर लवकरच उपलब्ध होणार आहे. या अपडेटमध्ये बदल झालेल्या तक्रार निवारण कार्यप्रणालीचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांना तक्रार केवळ ३ ते ४ स्टेप्समध्ये दाखल करता येणार आहे. तसेच नागरिकांना तक्रारींबाबत Feedback देणे, Rating देणे, तक्रार Re-open करणे इत्यादी सुविधा ॲपमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

या ॲपमुळे नागरी सुविधा आणि तक्रार करण्यासाठी वेगवेगळे ॲप्स वापरण्याची आवश्यकता नसणार. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. Citizen Grievance Systems Nashik Municipal corporation NMC e-Connect

Citizen Grievance Systems Nashik Municipal corporation NMC e-Connect नाशिक महानगर पालिका, mobile app, ऑनलाईन तक्रार निवारण कार्यप्रणाली संकेतस्थळ व मोबाईल ॲप, website tukaram munde, आयुक्त तुकाराम मुंढे, नागरी सुविधा, nashik news, मराठी बातम्या, marathi batmya, nashikonweb, online web newsportal, फिडबॅक
NMC e connect

नाशिक महानगरपालिकेत ऑनलाईन तक्रार निवारण कार्यप्रणाली सन  २०१४ साली सुरु करण्यात आली आहे व त्याचे मोबाईल ॲप्लिकेशन सन २०१५ साली सुरु करण्यात आले. ऑनलाईन तक्रार निवारण कार्यप्रणाली व मोबाईल ॲपद्वारे वार्षिक सरासरी 25,000 ते 30,000 इतक्या तक्रारी मनपास प्राप्त होतात.

हेच स्मार्ट नाशिक ॲप आपल्या स्मार्टफोन मध्ये आधीच डाउनलोड केले असेल तर ते केवळ अपडेट करून NMC e connect असा बदल होईल मात्र नवीन तक्रार निवारण प्रणाली त्यात येण्यार अजून २ ते ३ दिवस लागणार असून त्यानंतर पुन्हा ते ॲप अपडेट करावे लागेल. यामुळे नागरी सुविधा आणि तक्रार करण्यासाठी वेगवेगळे ॲप्स वापरण्याची आवश्यकता नसणार.

काय बदल करण्यात आलेत? Citizen Grievance Systems Nashik Municipal corporation NMC e-Connect

इथे वाचा कशी आहे मनपाची नवी तक्रार निवारण कार्यप्रणाली : नाशिक महानगर पालिकेच्या तक्रार निवारण कार्यप्रणाली अद्यतनित, तक्रारीचे होणार सुलभरित्या निराकरण

यापुर्वी नागरिकांना जुन्या तक्रार निवारण कार्यप्रणालीमध्ये तक्रारीचा प्रकार तसेच सदर तक्रार ज्या विभागाशी संबंधित आहे तो विभाग Select करावा लागत होता, तथापी नवीन कार्यप्रणालीमध्ये तक्रारीचा प्रकार Select केल्यानंतर विभाग Select करण्याची गरज नसुन ती तक्रार आपोआप संबंधित विभागांकडे वर्ग होणार आहे. त्यामुळे नागरिकांना तक्रार ही अत्यंत कमी स्टेपमध्ये दाखल करता येणार आहे.

घंटागाडी परिसरात येताच येणार मोबाईलवर अलर्ट

तुम्ही हे NMC e-connect ॲप डाउनलोड केलेले असेल तर या नवीन Update मध्ये घंटागाडी व पेस्ट कंट्रोल चे GPS ‍tracking ची देखील सुविधा उपलब्ध करणेत आली आहे. प्रथमत: एकदाच नागरिकांना Location Register करावयाचे आहे. तदनंतर घंटागाडी नागरिकांच्या घराजवळ आल्यास साधारणत: १० मिनिटे अगोदर ॲपद्वारे Alert मिळण्याची सुविधा उपलब्ध असुन नागरीकांना घंटागाडी करीता ताटकळत थांबायची आवश्यकता राहणार नाही.

***************

आमचे फेसबुक पेज लाईक करा : fb.com/NashikOnWeb

Share this with your friends and family

You May Also Like

4 thoughts on “Smart Nashik ॲपचे नावांत बदल NMC e-Connect, घंटागाडीचा मिळणार ‘अलर्ट’

  1. Good to know about Nashik and its food. I know nashik only about the onion but there are many other good places to visit and good things to know. thanks for this post.

  2. नमस्कार सर, प्रभाग १ मध्ये कंसारामाता चौकात जानेवारी २०२०ला बसवलेल्या स्ट्रीट लाईट पैकी न्यु श्रीपुष्कराज सोसायटीच्या समोरील शेवटचा दिवा लागत नाही .एकदा तक्रार केल्यानंतर बघुन गेलेत उद्या येऊन करून जातो म्हटले पण दहा दिवसांनंतर ही कारवाई झाली नाही. कृपया लक्ष घालावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.