ylliX - Online Advertising Network

Nashik CIDCO Stone Pelting सिडकोत नशेडी टुकारांचा राडा; केली दगडफेक, पोलिसांची नरमाईची भूमिका!

देशात लॉकडाऊन सुरू आहे. सर्वत्र कलम १४४ लागू करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना बाहेर निघण्यास सक्त मनाई आहे. मात्र दाट लोकवस्ती असलेला सिडको भागात मात्र नशेडी टुकार गुंडांचा उपद्रव सुरू झाला आहे. सध्या त्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे परिसरात दहशत माजली. Nashik CIDCO Stone Pelting

नेमका असा घडला प्रकार

गुरुवारी (दि. 16) दुपारच्या सुमारास सिंहस्थनगर, तुळजा भवानी चौक येथे काही नशेडी तरुण अंमली पदार्थाची नशा करत होते. हा एक प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. हे पाहून त्यांना हटकले. मात्र या बोलण्याचा त्या टुकार मुलांना राग अनावर झाल्याने टवाळखोरांनी त्यांच्या साथीदारांना बोलून घेत चौकातील नागरिकांच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर रस्त्यातील दुचाकी ढकलून देत त्यांचे नुकसान करीत नागरिकांना शिवीगाळ करून दहशत माजवली आहे.

या संपूर्ण घटनेमुळे घाबरलेले नागरिक रस्त्यावर जमा झाले होते. काही नागरिकांनी तक्रारीसाठी अंबड पोलिसात धाव घेतली असता पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही. त्यानंतर नागरिकांनी पुन्हा वरिष्ठांशी संपर्क साधून घटनेबाबत संशयितांविरोधात तक्रार दाखल केली. घडलेल्या घटनेत तब्बल 15 गुंड असताना पोलिसांनी केवळ चारच संशयित दाखवले. या घटनेबाबत पोलीस गांभीर्य घेत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. Nashik CIDCO Stone Pelting

पोलीसांची महिलांसमोर नागरिकांना शिवीगाळ

चौकात बसायला विरोध केला म्हणून १४ ते १५ जणांच्या टोळक्याने नागरिकांच्या घरावर दगडफेक करीत अनेक दुचाकी सायकल रस्त्यावर पाडून दहशत निर्माण केली.

या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या सर्व घटनेबाबत काही नागरिक हिंमत करून समोर आले व याबाबत पोलिसांकडे तक्रार मांडू लागले.

मात्र या ठिकाणी आलेले पोलीस अधिकारी यांनी नागरिकांकडून घटनेची माहिती घेण्याअगोदरच महिलांसमोर नागरिकांनाच शिवीगाळ केली. घटनेनंतर संशयित टवाळखोरांवर वर कारवाई करणे अपेक्षित असतांना, पोलिसांनी तक्रारदार नागरिकांनाच अरेरावीची भाषा केली.

पोलिसांच्या या भूमिकेबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून सदर घटनेतील टवाळखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.