ylliX - Online Advertising Network

गुप्त पद्धतीने छिंदम नगरला, जामिन मंजूर मात्र तरुंगातून सुटका नाही

माझ्यावरील आरोप राजकीय हेतून Chratrapati Shivaji Maharaj abusive word case court granted bail chhindam

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने तुरुंगात रवानगी झालेल्या श्रीपाद छिंदमला आज नगरच्या न्यायालयात  कोणालाही ठाव न लागता, अत्यंत गुप्तपणे नाशिक मध्यवर्ती कार्यालयातून पाठवले होते. अपशब्द प्रकरणी त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. मात्र त्याला दुसऱ्या गुन्ह्यात दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. ही सुनावणी नगर येथे न्यायदंडाधिकारी र. म. कुलकर्णी यांच्यासमोर करण्यात आली आहे.Chratrapati Shivaji Maharaj abusive word case court granted bail chhindam

श्रीपाद छिंदम याचे न्यायलयीन कोठडी संपली होती. मात्र नाशिक येथून त्याला अहमदनगर येथे नेण्यास नाशिक पोलिसांनी असमर्थत दर्शवली होती. त्यामुळे त्याचे तुरुगातून बाहेर येणे शक्य झाले नाही. मात्र आज पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे नाशिक मध्यवर्ती कारागृहातून सुरक्षित अहमदनगरच्या न्यायालयात हजर केले होते. अपशब्द प्रकरणी त्याने न्यायलयात जामीन मिळण्यासाठी त्याने अर्ज दिला होता. त्यावर आज सुनावणी झाली. तर त्याने जामीन अर्जात असे नमूद केले आहे की फिर्यादी दिलीप सातपुते यांच्याबरोबर आपला राजकीय वाद आहे त्यामुळे त्याने माझ्या विरुद्ध खोटी फिर्याद दाखल केली आहे. त्याबरोबर आई शुगरने आजारी असून, तिची देखभाल करणे व कुटुंबातील कर्ता असल्याने जामीन मंजूर करण्यात यावा असे त्याने नमूद केले आहे.  करावा, अशी भूमिका त्याने मांडली होती. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर करीत दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक रविवारी छिंदम याने पोलीस ठाण्यात हजेरी देण्याची अट घातली आहे. तसेच पोलीस तपासात हस्तक्षेप न करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात छिंदमला 19 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

Like Our Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.