चिन्मय मिशनतर्फे आयोजित गीता पठण स्पर्धा उत्साहात

नाशिक- दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील चिन्मय मिशन नाशिकद्वारा गीता पठण स्पर्धेचे आयोजन चिन्मयमिशन आचार्या ब्रह्मचारिणी प्रेरणा चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली चिन्मय चेतना आश्रम, पंचवटी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील शहरासह, मालेगाव, चांदवड येथील 16 शाळेतील 400 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.यावर्षी ही स्पर्धा श्रीमद्भगवत गीतेच्या 17 व्या  अध्यायावर चार गटात घेण्यात आली. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे रुपये 2000, 1000, 500 व 250 त्याचबरोबर प्रमाणपत्र, मानचिन्ह देण्यात आले.

चिन्मय मिशनचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, सेक्रेटरी गावले, विश्वस्त व्ही.एच. पाटील व आचार्या ब्रह्मचरिणी प्रेरणा चैतन्या यांच्या हस्ते पारितोषिके व  प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

अ गट (बालवाडी ते इ.1ली)- प्रथम- आर्या साखरेकर (बालविद्यालय, सिडको), द्वितीय- आरूषी ढगे (विद्या प्रबोधनी प्रशाला सीबीएसई) तृतीय- नचिकेत महाले (इंग्लिश मिडियम स्कूल, सिडको), उत्तेजनार्थ- ओवी दिक्षीत (विद्या प्रबोधिनी प्रााळा सीबीएसई), रुद्राणी चौधरी (रंगूबाई जुन्नरे).

ब गट (इयत्ता दुसरी ते चौथी)- प्रथम- वैद्येही सानप (न्यू इरा इंग्लिश स्कूल, गोविंदनगर), द्वितीय- तन्मय काळे (न्यू इरा इंग्लिश स्कूल), तृतीय- श्रुती शेलार( न्यू इरा), उत्तेजनार्थ- वेद कापडणीस (आदिनाथ इंग्लिश स्कूल, मालेगाव), समृद्धी उपासनी (न्यू इरा), स्वरा कुलकर्णी (इंग्लिश मिडियम स्कूल, सिडको).

क गट- (इयता 5 वी ते 7 वी)- प्रथम- चिन्मय गरूड (न्यू इरा), द्वितीय- अवि परांजपे (आदर्श विद्या मंदिर), तृतीय- अवनी कोंबडे (न्यू इरा), उत्तेजनार्थ- श्रेया वांगणेकर (रचना विद्यालय), सार्थक चव्हाण (नेमीनाथ जैन स्कूल, चांदवड).

ड गट- (इयत्ता 8 वी ते 10 वी)- प्रथम- नेहा कुर्‍हाडे (विद्या प्रबोधिनी प्रशाळा सीबीएसई), द्वितीय- केतकी देसाई (आरबीएच कन्याशाळा, मालेगाव), तृतीय- जीवन गुंजाळ (झु.प. काकाणी, मालेगाव), उत्तेजनार्थ- कु.तितिक्षा येवले (विद्या विकास इंटरनॅशनल स्कूल, मालेगाव), कोशी घाडमोडे (आरबीएच, कन्याशाळा, मालेगाव).

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.