बालकाचे वय अवघे दीड वर्ष होते.child died harbara nose cidco area nashik city
नाकात हरबरा अडकल्याने आणि त्या बालकाला वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले नसल्याने सिडको येथील दीड वर्षीय बालकाचा श्वास कोंडून मृत्यू झाला आहे. घटना जव्हा घडली तेव्हा पालकांनी मुलावर घरी उपचार करण्याचा प्रयत्न केला, जेव्हा गोष्ट हाताबाहेर गेली तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यास उशीर झाला आणि बालकाचा मृत्यू झाला आहे.child died harbara nose cidco area nashik city .
काही दिवसांपूर्वीच १० रूपयांचे नाणे गिळल्याने एका लहान मुलीचा मृत्यू झाला होता. मात्र पुन्हा तसाच प्रकार घडला आहे. सिडको परिसरातील राणे नगर चौकात हि घटना घडली आहे. सुजय बिजूटकर असे मृत मुलाचे नाव आहे. या मुलावर घरातील इतर लोकांनी उपचार केले , मात्र हा हरबरा जो बाहेर येत होता तो अजून नाकात अडकत गेला, मुलाचा श्वास कमी झाला असता त्याला दवाखाण्यात नेले असता त्याचा मृत्यू झाला होता.
काहीच दिवसांपूर्वीच नाशिक शहराजवळील चंदगिरी या गावातील चार वर्षीय मुलीनं दहा रुपयाचे नाणे गिळल्याने मृत्यू झाला होता. शालिनी दत्तात्रय हंडगे असे या मृत मुलीचे नाव आहे. शालिनीला उपचारासाठी आडगाव मेडिकल कॉलेज इथं नेण्यात आले होते. मात्र उपचार यशस्वी न होऊ शकल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पालकांना वेळीच काळजी घेतली नाही म्हणून हे दुर्दैवी प्रकार घडले आहे.