बालेकिल्ला : भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर लासलगावी जल्लोष

लासलगाव (वार्ताहर समीर पठाण) : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर लासलगाव येथील भुजबळ समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके व पेढे वाटून आनंद साजरा केला. chhagan bhujbal samarthak lasalgaon supporters celebrates bail mumbai high court

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चे बबन शिंदे, राष्ट्रीय काँग्रेसचे गुणवंत होळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश पालवे, कन्हैया पटेल, अश्विन शिंदे, मिरान पठाण, संतोष राजोळे, संजय काळे, संतोष बोराडे, सतीश पवार, हर्षद शेख, जुबेर शेख, सुरेश शिंदे, एजाज शेख, राहुल केदारे, आसिफ पठाण, रिजवान शेख, गौतम शिंदे, कैलास पठारे यांसह असंख्य समर्थक या वेळी उपस्थित होते.

भुजबळांना २ वर्षानंतर जामीन मंजूर झाला आहे.

१४ मार्च २०१६ पासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये मुक्काम होता. छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. अनेक दिवसापासून छगन भुजबळ यांनी जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र सतत त्यांना जामीन नाकारला जात होता. chhagan bhujbal samarthak lasalgaon supporters celebrates bail mumbai high court

छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी लासलगाव येथे जल्लोष केला आहे. त्याचप्रमाणे विंचूर टाकळी आणि येवल्यात सुद्धा छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर जल्लोष सुरू झाला आहे.

chhagan bhujbal samarthak lasalgaon supporters celebrates bail mumbai high court
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.