भुजबळ जोडो नाही तर ‘भुजबळ जेलसे छोडो’ आंदोलन झालं पाहिजे – राज ठाकरे

Chhagan Bhujbal Samarthak Anyay Pe Charcha Krushnkunj Raj Thackeray

मुंबई / नाशिक,५ फेब्रुवारी : छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत आता भुजबळ जोडो नाही तर ‘भुजबळ जेलसे छोडो’ आंदोलन झाल पाहिजे असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.नाशिक जिल्ह्यातील भुजबळ समर्थकांनी आज (दि. ५) कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. Chhagan Bhujbal Samarthak Anyay Pe Charcha Krushnkunj Raj Thackeray

Chhagan Bhujbal Samarthak Anyay Pe Charcha Krushnkunj Raj Thackeray

यावेळी नाशिकचे माजी खासदार देविदास पिंगळे, आ.जयवंतराव जाधव, आ.नरहरी झिरवाळ, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, राधाकिसन सोनवणे, श्रीमती मायावती पगारे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाशिक महापालिका माजी विरोधी पक्षनेत्या श्रीमती कविताताई कर्डक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, दिगंबर गिते,  मालेगावचे माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे, सटाणा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील मोरे, ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. कैलास कमोद, भुजबळ समर्थक बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे, अनिल जाधव, अॅड. सुभाष राउत, विष्णूपंत म्हैसधुणे, राजेंद्र मोगल, विलास बोरस्ते आदी उपस्थित होते.

यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर अन्याय होत असून त्यांच्यावर होणारा अन्याय हा संपूर्ण नाशिक जिल्ह्यावर होत आहे. त्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हा गेल्या दोन वर्षापासून विकासापासून वंचित राहिला आहे.त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व भुजबळ समर्थकांना जोडण्यात येत असून भुजबळांवर होणाऱ्या अन्याया साठी अन्याय पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.Chhagan Bhujbal Samarthak Anyay Pe Charcha Krushnkunj Raj Thackeray

त्यामाध्यमातून विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या जात असून ‘अन्याय पे चर्चेचे’ आयोजन करण्यात आले असल्याच्या आपल्या भावना समर्थकांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्या. Chhagan Bhujbal Samarthak Anyay Pe Charcha Krushnkunj Raj Thackeray

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आर्थिक गुन्ह्यांमध्ये छगन भुजबळ यांना अद्यापपर्यंत जमीन मिळणे गरजेचे होते. मात्र त्यांच्यावर सूड बुद्धीने कारवाई होत असून यांच्यावर अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले.यापुढे आता भुजबळ समर्थकांनी भुजबळ जोडो नाही तर भुजबळ जेलसे छोडो आंदोलन केले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी सर्व भुजबळ समर्थकांच्या भावना समजून घेतल्या.

यावेळी मनसे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत हेही उपस्थित होते.

भुजबळ समर्थक राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचे वृत्त आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. एकेकाळी भुजबळांच्या गळ्यात असलेल्या मफलरनेच त्यांचा गळा आवळावा असे वक्तव्य करणारे राज ठाकरे आता भुजबळ समर्थकांना मार्गदर्शक सूचना करणार काय अशी चर्चा रंगली होती.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.