ylliX - Online Advertising Network

आरक्षणासाठी कायदा दुरुस्ती आवश्यक असल्यास ती ताबडतोब करण्यात यावी – छगन भुजबळ

मुंबई  मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चेसाठी सर्वपक्षीय सदस्यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज दिनांक २८ जुलै रोजी विधानभवन येथे घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , विधिमंडळ पक्षनेते अजित पवार  व पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उपस्थित होते.chhagan bhujbal demands everything important maratha reservation please do
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की,मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. एससी,एसटी, ओबीसी घटकांवर अन्याय न होता हे आरक्षण देण्यात यावे. यासाठी कायदा दुरुस्ती आवश्यक असल्यास ती ताबडतोब करण्यात यावी, घटनेत तशी तरतूद करून घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. दोन तृतीयांश बहुमत होण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब स्वतः सहकार्य करायला तयार आहेत. त्यामुळे आंदोलनादरम्यान आत्महत्या,हिंसाचार यापासून सर्वांनी दूर रहावे,असे आवाहन भुजबळ यांनी केले. मागासवर्ग आयोगाचा निकाल आल्यानंतर जर त्यात कायद्याची त्रुटी असेल आणि बदल गरजेचे असतील तर ताबडतोब विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे. आम्ही सर्व त्यास सहकार्य करू, अशी ग्वाही भुजबळ यांनी दिली.chhagan bhujbal demands everything important maratha reservation please do
त्याचबरोबर राज्यातील७२,००० रिक्त पदांवर जी नोकर भरती करण्यात येणार आहे त्यात मराठा समाजाच्या जागा बाजूला काढून एससी, एसटी, ओबीसी सहित सर्व समाजाची नोकर भरती करावी.जेणेकरून इतर समाजावर अन्याय होणार नाही. ही नोकर भरती राज्यातील टाटा सोशल सायन्स सारख्या नि:पक्षपाती यंत्रणेकडून करावी. सध्या मराठा समाजाच्या आंदोलकांचे जे प्रचंड प्रमाणावर अटक सत्र सुरु आहे ते त्वरीत थांबवावे अशी मागणी भुजबळ यांनी यावेळेस केली.chhagan bhujbal demands everything important maratha reservation please do

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.