ylliX - Online Advertising Network

चर्मकार मंगलअष्टके तर्फे वधू-वर परिचय मेळावा, जुळल्या १९ गाठी

गुजरातसह राज्यातील अनेक ठिकाणाहून शेकडो चर्मकार बांधवांची हजेरी

नाशिक : चर्मकार समाजातील शिक्षित तरुण – तरुणींना अनुरूप जोडीदार मिळावा यासाठी चर्मकार मंगलअष्टके सामाजिक संस्थे तर्फे वधू-वर परिचय मेळावा  नाशिक रोड येथील कुलकर्णी मंगल कार्यालय येथे पार पडला आहे. या मेळाव्यात गुजरातसह राज्यातील अनेक ठिकाणाहून चर्मकार बांधवांची हजेरी हजेरी लावली असूनपहिल्याच मेळाव्यात १९ जोड्या जुळल्या आहेत. मेळाव्याचे वैशिष्ट्य असे की समाजातील शिक्षित तरुणांनी एकत्र येत वर्गणी जमवून हा मेळावा आयोजित केला होता, तर यात सहभागी इच्छुकांकडून कोणतेही शुल्क आकारले गेले नाही.

मेळाव्यास उपवर व उपवधू संख्या 300 आणि तर सर्व समाज बांधव मिळून ६०० उपस्थिती होते. मेळाव्यास मुंबईनाशिकधुळेनंदुरबारजळगाव  जिल्ह्यासह गुजरात येथील सुरत येथील समाज बांधवानी हजेरी लावली आहे.

या कार्यक्रमास चर्मकार समाजातील बांधवांनी  उत्तम चांगला  प्रतिसाद दिला.त्यामुळे भावी वधू वर यांना भावी जीवनसाथी मिळण्यास सहज  मदत  झाली.बदलत्या काळानुसार उप वधू वरा ने देखील आपला जीवन साथी कसा असावा या बद्दल आपले मत निर्भयपणे मांडले.

सदर मेळाव्याचे आयोजन  राजेंद्र  नामदेवराव अहिरे ,  रविंद्र  अहिरे दौलत समशेरयांनी केले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रकाश अहिरेशंकर समशेर,शशिकांत विठ्ठूलराव अहिरेफुलसिंग  अहिरे शंकर काकवीपुरे यांचे मार्गदर्शन लाभले .

सदर मेळाव्याच्या आयोजनासाठी  दीपक अहिरे लीना अहिरे बापू ठाकरे माधुरी आहिरे योगीता चव्हाण कविता आहेर संतोष काकविपुरे  मुकेश  कार्लेकरममता कार्लेकर . सुभाष आशान,  गणेश बर्वे यांनी कार्य केले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.