ylliX - Online Advertising Network

Pakistan Zindabad ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी

पुण्यामध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील मुस्लीम समुदायामधील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या कारवाईविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान ही घोषणाबाजी करण्यात आली.Pakistan Zindabad

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार या घोषणाबाजी प्रकरणात पुणे पोलिसांनी रियाज सय्यद आणि ६० ते ७० पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोळा झाल्याचा उल्लेख यामध्ये पोलिसांनी केला आहे.

पीएफआयविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचं नियोजन या आंदोलकांनी केलं होतं. मात्र हे आंदोलन सुरु होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आलं. यावेळी अनेकांना पोलिसांच्या गाडीमध्ये बसवलं.

पण पुणे पोलीस म्हणतात, तसं काही झालं नाही!

 शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांनी आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी आंदोलकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा दिल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळी आंदोलकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा कोणत्याही घोषणा दिल्या नाहीत. आंदोलकांकडून यावेळी ‘पॉप्युलर फ्रंट जिंदाबाद, पीएफआय जिंदाबाद’ अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या, असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. आंदोलकांवर बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.

पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांना NIA या केंद्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ पुण्यात काल PFI संघटनेच्या समर्थकांनी आंदोलन केले होते. मोठ्या संख्येने आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झाले होते. त्यावेळीचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आंदोलक विविध घोषणा देताना दिसत आहे.

बंडगार्डन पोलीसांचा माहिती-

सोमवारी पुणे शहरात पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांना आंदोलन करण्याची परवानगी नाकारली होती. तरीही या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीर जमाव जमवला होता. त्यावेळी पोलिसांनी तत्काळ 41 आंदोलकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दलचा अधिक तपास बनगार्डन पोलिस करत असल्याची माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांची प्रतिक्रिया दिली.

“ज्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या त्यांना सोडणार नाही,” असं म्हणत फडणवीसांनी गंभीर इशारा दिला. ते शनिवारी (२४ सप्टेंबर) नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात आणि भारतात कुणी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणार असेल तर त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कारवाई करू. ते जिथं असतील तिथून शोधून काढून कारवाई करू.”
यावेळी फडणवीसांनी एनआयएने केलेल्या कारवाईचं समर्थन केलं. ते म्हणाले, “पीएफआयवर कारवाई झाली याचा अर्थच असा आहे की, यासंदर्भातील मोठ्या प्रमाणात वेगवेगळे पुरावे एनआयएकडे, एटीएसकडे आणि केंद्र व राज्य सरकारकडे उपलब्ध आहेत. यापूर्वीही केरळसारख्या सरकारने पीएफआयवर बंदी टाकण्याची मागणी केली आहे. सध्या तपास सुरू आहे. त्यातून अनेक गोष्टी बाहेर येतील.”

सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे,–मनसेप्रमुख राज ठाकरे

Pakistan Zindabad RAJ THKREY

केंद्रीय तपास यंत्रणेने पीएफआयच्या राज्यस्तरीय नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आरोपींनी मोठमोठ्याने घोषणा देत रस्ता अडवला. त्यात पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबरचे नारे देण्यात आले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता मनसेप्रमुख राज ठाकरे देखील आक्रमक झाले आहेत.

एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिली आहे. ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे, ह्या गंभीर आरोपांखाली…थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही ह्या देशद्रोह्यांचं समर्थन करत जर ह्या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या, आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले.

माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की, यापुढे पाण्यासाठी देखील ( पा ) उच्चारता येणार नाही, नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित असल्याचं राज ठाकरेंनी पोस्टद्वारे म्हटलं आहे.Pakistan Zindabad

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.