ylliX - Online Advertising Network

rain in the state वादळी वाऱ्यासह राज्यात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या काही भागात हलक्या स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. रविवारी ४ ऑक्टोबरला कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर खानदेशातील धुळे, नंदुरबार आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्हयात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या सुत्रांनी वर्तविली आहे.rain in the state

अरबी समुद्र, दक्षिण गुजरात आणि दक्षिण महाराष्ट्राची किनारपट्टी या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती मागील तीन दिवसांपासून कायम आहे. यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात हलका पाऊस पडत आहे. तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

शनिवारी (३ ऑक्टो) चिपळूण येथे सर्वाधिक १४७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर गुहागरमध्ये १२० मिलिमीटर पाऊस पडल्याने ओढ्याना पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे भात काढणीची कामे खोळंबल्याची स्थिती आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात ढगाळ असून अधूनमधून ऊन पडत आहे. पुढील दोन ते तीन दिवस या भागात ढगाळ हवामान राहिल. उद्या कोकणातील रत्नागिरी, सिंधूदूर्ग, धुळे, पुणे, नाशिक, नगर, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्हयात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. तर इतर भागात काही प्रमाणात उघडीप राहिल.मध्य महाराष्ट्रात नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली जिल्हयात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून शेतात पाणी साचल्याने काही प्रमाणात नुकसान झाले होते. विदर्भातही पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

शनिवारी (३ ऑक्टोबर) सकाळी आठ वाजेपर्यत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये – (स्त्रोत, हवामान विभाग)
कोकण – मोखेडा २.६, वाडा ६, खालापूर १४, महाड २, चिपळूण १४७, गुहागर १२०, लांजा १२, राजापूर ४, रत्नागिरी ४, संगमेश्वर १०, कणकवली ६२, कुडाळ ३, मालवण ४, वैभववाडी ३५, अंबरनाथ १, कल्याण १
मध्य महाराष्ट्र – यावल ३५, गडहिंग्लज ३८, गारगोटी ४, हातकणंगले १२, कागल १५, करवीर १६, पन्हाळा १४, शाहूवाडी ३, देवळा ८.४, दिंडोरी १४, इगतपुरी ७, कळवण ३, नाशिक १९.२, पेठ ४२, सिन्नर १२, मिरज ३.२, सांगली ४.५, शिराळा ७, वाळवा ५, महाबळेश्वर ११.९, पाटण १७
मराठवाडा – पैठण ९
विदर्भ – दारव्हा २.२, नेर ४.२, पुसद २.४rain in the state

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.