ylliX - Online Advertising Network

चामर लेणी परिसर : ६ अडकले डोंगर कड्यावर, वाचविण्यात यश, एक गंभीर जखमी

चामर लेणी ट्रेकिंग शालेय विद्यार्थी : ६ अडकले, रेस्क्यू झाले  एक गंभीर जखमी

नाशिक : नाशिक येथील चामर लेणी डोंगरावर  ट्रेकिंग साठी गेलेल्या ४  मुले रस्ता हरवला म्हणून अडकले होते. यात त्यांना वाचवायला गेलेला दोघांपैकी  एक तरूण घसरून पडल्याने जखमी झाला आहे, मात्र आता या सर्वाना रेस्क्यू करण्यात आले आहे. या प्रकरणात ही मुख्य अडकलेली ४ मुले शाळा बुडवून ट्रेकिंग साठी गेली होती.  सकाळी अग्निशमन दलाला महिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाने मिळून या मुलांना सुखरूप खाली आणले आहे. त्यामुळे कोणताही होणारा अनर्थ टळला आहे.

यां परिसरात ट्रेकिंग करताना १. नयन रोकडे, २. रोहन शेळके , ३. आदित्य खैरनार, ४. आर्यन गिते, ४. सौरभ पाटील हे ५ जण अडकले तर ६. देवेंद्र पाटील हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालय सावतानगरमधील इयत्ता नववीत शिकणारे आहेत. नाशिकच्या सिडकोचे हे चौघे रहिवासी आहेत. सुदैवाने यामध्ये कोणीही जीव गमवला नाही. सोशल मिडीयावर अफवानावर विश्वास ठेवू नका असे प्रशासनाने कळवले आहे.

चामर लेणीवर  गेलेले चार विद्यार्थी सोमवारी सकाळी कड्यावर अडकल्याची घटना घडली आहे. या मुलांना वाचविण्यासाठी गेलेला दोघा पैकी  तरूण कड्यावरून खाली पडला असून गंभीर जखमी झाला.

सकाळी अकरा वाजेपासून या मुलांना खाली आणण्याचे प्रयत्न सुरू होते. चामर लेणीवर  गेलेले चार विद्यार्थी सोमवारी सकाळी कड्यावर अडकल्याची घटना घडली आहे. या मुलांसोबत मुली सुद्धा होत्या मात्र त्या उंच आहे म्हणून माघारी फिरल्या होत्या, या मुलांना वाचविण्यासाठी गेलेला एक तरूण कड्यावरून खाली पडला असून गंभीर जखमी झाला आहे.

“आम्ही सर्व मित्र ट्रेकिंग साठी आलो होतो आधी वर गेलो मात्र आम्हाला रस्ता काही केल्या कळत नव्हता त्यामुळे आम्हाला भीती वाटली आणि आम्ही तेथेच थांबलो होतो.” – नयन रोकडे विद्याथी

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.