दोन रानमांजरे युवकांनी वाचवली

लासलगाव (प्रतिनिधी) :- तीव्र कडक उन्हाळा असल्याने पाण्याची तहान भागविण्यासाठी माणसे हैराण झाले असतांनाच शोधार्थ लासलगावच्या लक्षी ऑईल मिलमधील टाकीत अडकून पडलेल्या दुर्मिळ जातीच्या दोन उदमांजरांना वाचविण्यात लासलगाव येथील तरुणांना यश आले आहे. तर तीनपैकी एक उदमांजर मृतावस्थेत आढळले. हि तीन उदमांजरे पाणी पिण्यासाठी पाच दिवसांपूर्वीच  टाकीत उतरली असल्याचा अंदाज आहे. पाणी न मिळाल्याने व परत वर येता न आल्याने यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना लासलगाव येथील लक्ष्मी ऑईलमिलमध्ये झाली आहे. शनिवारी सकाळी हि बाब लक्षात येताच ग्रामपंचायत कर्मचारी बाबा गीते यांनी याघटनेची माहिती सर्पमित्र प्रमोद महानुभाव यांना दिली. त्यानंतर प्रमोद महानुभाव यांच्यासह इंद्रनील खंदारे, संजय बिरार, संदीप जाधव, निखील भारती, श्रीकांत कुमावत यांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. महानुभाव यांनी पाणी भरलेली बदली या टाकीत सोडली. काही वेळातच उदमांजरांनी बादलीतील पाणी पिले. त्यानंतर वनविभागाला पाचारण करण्यात आले. महानुभाव यांनी टाकीत उतरून बांबू सोडला. एका उदमांजराने बांबूचा  सहारा घेत वर येऊन धूम ठोकली. तर अशक्त अवस्थेतील दुसऱ्या उदमांजराला वनविभागाने उपचारासाठी ताब्यात घेतले आहे. मृत पावलेल्या  उदमांजराचा पंचनामा करून वनविभागाचे कर्मचारी गंडे यांनी ताब्यात घेतले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.