नाशिक : इंस्टाकार्ट या कुरियर कंपनीमध्ये काम करणाऱ्या भामट्यांनी कंपनीची फसकवणूक केल्याची बाब उघडकीस आली होती. या प्रकरणी नाशिक शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेच्या पथकाने या दोघा भामट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण १० कॅमेरे, ३ लॅपटॉप असा ६ लाख, २५ हजार, ५५० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फ्लिपकार्ट, मिंत्राच्या वेबसाईट वरून बनावट ग्राहकांच्या नावे त्या पत्त्यांवर कॅनन निकॉन या कंपन्यांचे कॅमेरे, लॅपटॉप मागवून त्या वस्तू ग्राहकांनी परत केल्या असे सांगून पर्सलमध्ये दगड व पुठ्ठे टाकून संशय येणार नाही असे पॅकिंग करून परत पाठवले जात होते. एकाच भागातून असा प्रकार घडत aslyqche लक्षात येताच कंपनीच्या व्यवस्थापकाने उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान पोलीस नाईक रेवगडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी प्रवीण शिवाजी घोलप (वय : २०, रा. चेहडीगाव, नाशिकरोड) याने चेहडी परिसरात कॅनन, निकॉन कंपनीचे कॅमेरे विक्री केले आहे अशी माहिती मिळाली. त्यास ताब्यात घेऊन विचारपूस करता तो त्याचा साथीदार गणेश भीमा ताळपाडे (वय : २३, रा. सिंहस्थ नगर, सिडको, नाशिक हे इंस्टाकार्ट सर्व्हिसेसच्या जयभवानी रोड, नाशिक रोड येथील कार्यालयातून वस्तू पोचविण्याचे नोकरी करत होते.
हे दोघेही लाखो रुपयाच्या वस्तू या नोकरीचा फायदा घेत बनावट ग्राहकांची नाव, पत्ता, इमेल अशी माहिती फ्लिपकार्ट, मिंत्रा या ई कॉमर्स साईट्सवर टाकून कॅमेरे, लॅपटॉप सारख्या महागड्या वस्तू मागवून ती वस्तू त्या बनावट ग्राहकांनीच परत केल्याचा बनाव करून त्या बॉक्समधून वस्तू काढून त्याजागी दगड वा पुठ्ठे भरून जसल्यातशी पॅकिंग करून परक्त पाठविल्या जात होत्या. मॅनेजरला ही गोष्ट लक्षात येताच अज्ञातांविरोधात उपनगर पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलाम ४२०, ४०६, ४०८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
या दोघा भामट्यांकडून कॅनन कंपनीचे ६, निकॉनचे ४ कॅमेरे, तर डेल कंपनीचा १, एचपी कंपनीचा १ आणि लेनोवो कंपनीचा १ लॅपटॉप असा ६ लाख २५ हजाराचा माल हस्तगत करण्यात आला आहे.