ylliX - Online Advertising Network

budget 2020आर्थिक वर्षातील २१६० काेटीचे मूळ अंदाजपत्रक३९ लाखांचा मिळणार निधी ; नगरसेवक खुश

आर्थिक खडखडाटामुळे यंदा काेणत्याही नवीन प्रकल्पाला स्थान न देता शहर बससेवेवर ११० काेटी तर हरित क्षेत्र विकासाशी संबंधित मखमलाबाद व हनुमानवाडी भागातील रस्ते, पुलांसह पालिका हद्दीतील २३ खेड्यांमध्ये मूलभूत सुविधांवर अधिकाधिक खर्च करण्याचा मनाेदय व्यक्त करीत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील २०८० काेटीचे सुधारित तर सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील २१६० काेटीचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीसमाेर सादर केले. अंदाजपत्रकात खास असे काहीच नसून नवीन प्रकल्पांनाही ब्रेक लावल्याचे सभापती उद्धव निमसे यांनी ते स्वीकृत करून आज बुधवारी स्थायी समिती बैठकीनंतर मंजुरी दिली जाणार असल्याचे जाहीर केले.

३९ लाखांचा मिळणार निधी ; नगरसेवक खुश

तुकाराम मुंढे यांच्या काळात पालिकेच्या नगरसेवक निधीला ब्रेक लावला हाेता. नगरसेवक निधीला कायदेशीर आधार नसल्याचे मुंढे यांनी ठणकावून सांगितले हाेते. त्यामुळे नगरसेवकांच्या राेषाचा सामना करावा लागला हाेता. गमे यांनी गेल्या वर्षीपासून प्रभाग विकास निधी या संकल्पनेतून ३० लाख रुपयांचा निधी १२२ मुळ व ५ स्वीकृत अशा १२७ नगरसेवकांना दिला हाेता. यंदाही आयुक्त गमे यांनी तीच तरतूद पुन्हा करून नगरसेवकांना ३० लाखाचा प्रभाग विकास निधी दिला आहे. चार सदस्यीय मिळून एक प्रभाग असल्याने एका प्रभागाला एक काेटी २० लाख रुपयांचा निधी मिळेल. हा निधी ५ लाख रुपयांच्या मर्यादेत खर्च करता येणार असून प्रभाग समिती स्तरावरच मान्यता मिळणार आहे. याबराेबरच पालिकेला स्व उत्पन्नातून बांधील खर्च वजा जाता दाेन टक्के निधी राखीव ठेवून नगरसेवकांसाठी देण्याची तरतूद आहे. चालू वर्षासाठी १२ काेटीची तरतूद केली असून त्यातून नऊ लाख ४४ हजार रुपये नगरसेवकांना मिळेल. दाेन्ही मिळून ३९ लाखांपर्यंत निधी मिळणार असल्यामुळे नगरसेवक खुश असणार आहेत.

>>महत्त्वाच्या घाेषणा

  1. पालिका हद्दीतील खेड्यांचा विकास, खडीकरण, डांबरीकरण व मिस लिंक जाेडणार
  2.  हरित क्षेत्र विकास प्रकल्पातील ऊड्डाणपुलासह नवीन पुल व अन्य पायाभूत
  3. सुविधांसाठी खर्च
  4. शहर बससेवेसाठी ११० काेटींची तरतूद
  5. मार्च ते एप्रिलपर्यंत कर भरणाऱ्यांना सवलत
  6. रामायण बंगल्याजवळ १२ मजली नवीन इमारत; पहिल्या टप्प्यात दुमजली काम
  7. पंचवटीत महिलांसाठी नवीन जलतरण तलाव
  8. गंगापूरराेड, आडगावला नवीन व्यावसायिक संकुल बांधणार.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.