ylliX - Online Advertising Network

३री बोधी कला संगिती २०१८ चे आयोजन ,कथाकथन, काव्यकार, संमेलन, एकांकिका, नाटक, परिसंवाद अशी रेलचेल

नाशिककरांना मोठी साहित्यिक मेजवानी,सोबतच दिग्गज मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी     
नाशिक : साहित्य नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य आणि बोधी नाट्य परिषद, मुंबई आयोजित ३री बोधी कला संगिती २०१८ संपन्न होत आहे. येत्या २५ ते २८ सप्टेंबर २०१८ या कालावधीत परशुराम सायखेडकर नाट्यगृह, शालीमार येथे याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ज्ञानासाठी कला’ ही संकल्पना घेऊन नाशिकच्या साहित्य, संस्कृती आणि अभिरुचीला नवा आयाम देण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. यामध्ये दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत परिसंवाद, काव्यकार संमेलन, कथाकथन, गीत गायन, एकांकिका आणि चिंतन अशी मोठी साहित्यिक मेजवानी या निमित्ताने  नाशिककरांना मिळणार आहे.bodhi sangiti 2018 Nashik many writers poets plays showing news 
व्हीवो चा जबरदस्त फोन बाजारात क्लिक करा माहिती घ्या !
 
आज (दि. 21) झालेल्या पत्रकार परिषदेत प्रेमानंद गज्वी यांनी माहिती दिली. यावेळी डॉ. सुरेश मेश्राम, अशोक हंडोरे, राज बाळदकर आदी उपस्थित होते.  bodhi sangiti 2018 Nashik many writers poets plays showing news 
पुस्तक प्रेमी अआहात मग इथे क्लिक करा वाचा विकत घ्या उत्तम पुस्तके !


 
सुरुवातीला बोधी कला संगितीचे उद्घाटन २५ सप्टेंबर,२०१८, मंगळवार रोजी संध्याकाळी साडे पाच वाजता लक्ष्मीकांत देशमुख (९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, बडोदा) यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर हेमांगी कटारे यांचे बंदिशी चे गायन होणार आहे. सदर बंदिशी प्रेमानंद गज्वी यांनी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर ज्ञानासाठी कला या संदर्भात आणि एकुणच बोधी कला संगिती बाबत प्रेमानंद गज्वी भूमिका मांडतील. या कार्यक्रमाला  प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सतीश पावडे, वर्धा (लेखक, दिग्दर्शक), आणि विशेष अतिथी म्हणून इब्राहिम अफगाण (सदस्य, साहित्य आणि संस्कृती मंडळ,महाराष्ट्र राज्य), शशिकांत सावंत (सदस्य, साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य) हजर राहणार आहेत. त्याबरोबर भगवान हिरे, राज बाळवदकर, अशोक हंडोरे यांची ही उपस्थिती लाभणार असून स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.bodhi sangiti 2018 Nashik many writers poets plays showing news 
 
सोबतच ‘मराठी साहित्यातील वैचारिकता’ या विषयावर परिसंवाद होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. अनिल सपकाळ (मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ), असतील. देवेंद्र उबाळे, मुकुंद कुलकर्णी, डॉ. अलका शिंदे (पवार), हरीश इथापे याचा सहभागी होतील.bodhi sangiti 2018 Nashik many writers poets plays showing news 
 
कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी २६ सप्टेंबर,२०१८ बुधवार रोजी संध्याकाळी साडे पाच वाजता, कै.मु.शं. औरंगाबादकर सभागृहात सुरुवातीला काव्यकार संमेलनात अध्यक्षस्थानी कपूर वासनीक (बिलासपुर,छत्तीसगड) तर काव्यकार म्हणून काशीनाथ वेलदोडे, सी.टी. देवकर, पी. कुमार, अशोक भालेराव, हिरामण पिंप्रिकर, शिवाजी भालेराव, बुद्धभूषण साळवे, गौरव आठवले, अॅड. अशोक बनसोडे, स्मिता शिंपी, प्रा. जयश्री बागुल (खरे), अनिल पगारे यांचा सहभाग असणार आहे. तर कथाकथनमध्ये अध्यक्षस्थानी चंद्रकांत महमिने (ज्येष्ठ साहित्यिक,नाशिक) कथाकार नंदकिशोर साळवे, रोहित पगारे, संजय डोंगरे असतील.
bodhi sangiti 2018 Nashik many writers poets plays showing news 
तिसऱ्या दिवशी २७ सप्टेंबर २०१८, गुरुवार रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता, प.सा. नाट्यगृहात गीत गायन रोहित उन्हवणे, सार्थक खैरनार, सादर करतील. त्यानंतर लोकहितवादी मंडळ, नाशिक ‘काजवा’ ही एकांकिका  सादर होणार आहे. याचे लेखक भगवान हिरे यांचे असून दिग्दर्शन पूजा वेदविख्यात यांचे आहे. यानंतर चिंतनाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये ‘मी का लिहितो’ या विषयावर गंगाधर आहिरे, किशोर पाठक, रा.शी.दोंदे, मधुकर जाधव, अशोक हंडोरे हे विचार मांडतील. 
 
समारोपाच्या दिवशी २८ सप्टेंबर २०१८, शुक्रवार रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता, प.सा. नाट्यगृहात बोधी नाट्य परिषद कल्याण शाखा निर्मित दोन अंकी नाटक ‘हवे पंख नवे’ सादर केले जाणार आहे. नाटकाचे लेखक प्रेमानंद गज्वी, दिग्दर्शक अशोक हंडोरे याचे आहे.
bodhi sangiti 2018 Nashik many writers poets plays showing news 
प्रतिक्रिया :
नाशिक नगरीला साहित्याची मोठी परंपरा लाभली आहे. हीच परंपरा पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. यातून विचारांचे मंथन होऊन नवी साहित्य  निर्मितीला चालना मिळणार आहे. साहित्यातील लोकप्रिय प्रकारांचे सादरीकरण करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा उद्देश आहे.
— भगवान हिरे, समन्वयक, 3री बोधी नाट्यपरिषद
 
कला कुणाचीही बटीक नसते आणि बटीक असते ती कला नाते आणि म्हणूनच ‘कलेसाठी कला’ की ‘जीवनासाठी कला’ या वादात अर्थ नसतो आणि जीवणासाठीही! तर ती असते ज्ञानासाठी. (Art For Knowledge) ज्ञानात्मक कलाच कलेची आणि जीवनाची वृद्धी करीत असतात. कलेच्या अंगाने ज्ञानाचा विचार करण्यासाठी हा चार दिवसाचा कार्यक्रम होणार आहे.
— प्रेमानंद गज्वी, नाटककार, साहित्यिक
बोधी संगिती कार्यक्रम पत्रिका :
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.