remedicivir injection black-market ‘रेमडेसिविर इंजेक्शन 25 हजारांना डॉक्टरला अटक

नाशिक : नाशिक शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे मात्र ‘रेमडेसिविर’चा काळाबाजार करताना चक्क एका डॉक्टरला अन्न औषध प्रशासन व पोलिसांच्या संयुक्त पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे अमृतधाम भागात एक खासगी डॉक्टरच रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचे उघडकीस आले आहे. रेमडेसिविर इंजेक्शन 25 हजारांना विकणाऱ्या संशयित डॉ.रवींद्र श्रीधर मुळक(40) यास पंचवटी पोलिसांनी रविवारी रात्री उशीरा अमृतधाम भागातून ताब्यात घेतले आहे. \\
पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. मुळक याने तीन रेमडेसिवीर इंजेक्शन असल्याचे तक्रारदारास सांगितले होते. एका रेमडेसिवीर इंजेक्शन किंमत 25 हजार असल्याचेही सांगितले. त्यानुसार तक्रादाराने खरेदीची तयारी दर्शविली. 5 हजार रुपये कमी पडत असल्याचे सांगत एटीएम सेंटरजवळ आले. तक्रारदाराने 100 क्रमांकावर कॉल केल्याने प्रकरण उघडकीस आले आहे. विषेश म्हणजे डॉ.मुळक याचे पंचवटीमधीलसद्गुरु रुग्णालयात कार्यरत असून, त्याचे म्हसरुळमध्ये स्त्री क्लिनिक आहे. पंचवटी पोलिसांनी तक्रादाराच्या मदतीने डॉ.मुळक यास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले आहे.remedicivir injection

पोलिसांच्या माहितीनुसार, मुळक याने तीन रेमडेसिवीर इंजेक्शन असल्याचे तक्रारदारास सांगितले होते. एका रेमडेसिविर इंजेक्शनची किंमत 25 हजार रुपये असल्याचेही सांगितले. त्यानुसार तक्रादाराने खरेदीची तयारी दर्शविली. 5 हजार रुपये कमी पडत असल्याचे सांगत एटीएममध्ये जाऊन येतो असे सांगून तक्रारदाराने 100 क्रमांकावर कॉल करत थेट पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस पथकाने अन्न औषध प्रशासनाच्या पथकाला सोबत घेत घटनास्थळ गाठले. तेथे एका कारमध्ये मुळक हे रेमडेसिविर इंजेक्शनच्या तीन बाटल्या (वायल्स) घेऊन ग्राहकाची येण्याची प्रतीक्षा करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांचच्या कारची झडती घेऊन इंजेक्शनच्या तीन बाटल्या जप्त केल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले. विषेश म्हणजे डॉ.मुळक याचे पंचवटीमधील एका खासगी रुग्णालयात कार्यरत असून, त्याचे म्हसरुळमध्ये स्त्रीरोग क्लिनिकसुद्धा आहे. पंचवटी पोलिसांनी तक्रादाराच्या मदतीने मुळक यास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. पंचवटी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध विविध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. मुळक याने तीन रेमडेसिवीर इंजेक्शन असल्याचे तक्रारदारास सांगितले होते. एका रेमडेसिवीर इंजेक्शन किंमत 25 हजार असल्याचेही सांगितले. त्यानुसार तक्रादाराने खरेदीची तयारी दर्शविली. 5 हजार रुपये कमी पडत असल्याचे सांगत एटीएम सेंटरजवळ आले. तक्रारदाराने 100 क्रमांकावर कॉल केल्याने प्रकरण उघडकीस आले आहे. विषेश म्हणजे डॉ.मुळक याचे पंचवटीमधीलसद्गुरु रुग्णालयात कार्यरत असून, त्याचे म्हसरुळमध्ये स्त्री क्लिनिक आहे. पंचवटी पोलिसांनी तक्रादाराच्या मदतीने डॉ.मुळक यास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले आहे.remedicivir injection

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.