ylliX - Online Advertising Network

स्वयंसेवी संस्थांच्या समस्या सोडविणार – लक्षमण सावजी

नाशिक –भारतीय जनता पार्टीच्या अंत्योदय अभियानाच्या (एन.जी.ओ.सेल) पुढाकाराने नाशकात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांचा हब तयार करून त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यात येईल, असे प्रतिपादन  भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी केले.bjp party solving problems ngo giving them support nashik news 
भाजपच्या अंत्योदय सेलतर्फे महानगर भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे आयोजित स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना सावजी बोलत होते.व्यासपीठावर भाजप महानगर संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, अंत्योदय सेलचे महानगर अध्यक्ष अविनाश पाटील, नीलेश बोरा आदींसह आदिवासी, दलित, शिक्षण, आरेग्य, आय.टी. आदी क्षेत्रात काम करणाऱ्या  स्वयंसेवी संस्थांचे 50हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.bjp party solving problems ngo giving them support nashik news 

 तुमचा आवडते  नेता नरेद्र मोदी आहेत, मग हे पुस्तक तुमच्या साठी आहे, मोदी यांची राजकीय खेळी आणि प्रवास, एकदा क्लिक कराच !

नाशकतील सर्वच स्वयंसेवी संस्थांचे कामकाज चांगले आहे. त्यांना येथे पोषक वातावरण आहे. समाजातील  शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात सामील करून  घेणे गरजेचे असून त्यामुळेच त्यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या या सर्व संस्थांचे एकत्रीकरण करण्याचा मानस आहे. स्वयंसेवी संस्थांच्या महिला बचत गटांच्या वस्तूंचे आणि विविध उपक्रमांचे प्रदर्शन लवकरच नाशकात भाजपतर्फे आयोजित करण्यात येईल,असेही सावजी यांनी पुढे नमूद केले.bjp party solving problems ngo giving them support nashik news 

 मोबाइल डिस्चार्ज मग काय करणार ? अहो इथे क्लिक करा आणि बॅॅटरी बॅॅकअप मिळवा !

यावेळी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी विविध सूचना मांडल्या एडस् जनजागृतीचे काम करणाऱ्या संस्थांना गेल्या अनेक वर्षापासून निधी मिळालेला नाही, बचत गटांचे काम करणाऱ्यांना बॅकांच्या विविध अडचणींना सामोरे जावे लागते, स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमांची माहिती व्हावी यासाठी या संस्थांची पुस्तिका काढावी, कौशल्य विभागास गेल्या तीन वर्षापासून निधी प्राप्त झालेल्या नाही, ग्रामीण भागात स्वयंसेवी संस्थांचे व्यापक जाळे विणावे आदी सूचनांचा त्यात समावेश आहे. या समस्या सोडविण्याचे आश्वासन सावजी यांनी दिले. प्रास्ताविक सेलचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले. प्रशांत जाधव यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.bjp party solving problems ngo giving them support nashik news 

 बॅॅग विकत घ्यायचा विचार करताय ! मग इथे क्लिक करा बाजार भावा पेक्षा कमी किंमत आणि उत्तम क्वालिटी 

यावेळी डॉ.चंद्रशेखर नामपूरकर, निलीमा साठे, शोभा सानवणे, उदय रत्नपारखी, स्मिता जोशी, हेमा साठे, सोनल दगडे, डॉ.रत्नाकर पवार, जयराम मोंढे, जयराम वाघ, माधुरी भांमरे, राजेंद्र गमे, धनंजय चिंचोलकर, सागर देवरे, महेश अहिरराव , संजय अवटे, आसावरी देशपांडे, मनिषा जोशी, सोनल जाधव, शारदा शिरसाट, विजयकुमार पाळेकर, संदिप सुतार, विलास शिंदे, सागर राऊत, राजेंद्र घुगे, चंद्रकांत चिंचोले, शाहीद शेख, शोभा सोनवणे, शाम घरोटे, धनंजय खैरनार, राजेंद्र पळसकर, बापू बैरागी, दुर्गेश चित्ते, लक्ष्मीकांत पारनेरकर, डॉ.संदीप सुतार, रविंद्र दुसाने, महेंद्र मुळे, ॲड. शाम करवटे, डॉ.राजेश साळुंखे आदी स्वयंसेवी  संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

bjp party solving problems ngo giving them support nashik news 
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.