ylliX - Online Advertising Network

भाजपाच्या तीनही विभागांच्या विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण, विद्यमान आमदारांसोबत अनेक उमेदवार इच्छुक

भाजपा तर्फे नाशिक मध्ये विधानसभा निवडणूक तयारी सुरु झाली असून त्याचाच भाग म्हणून नाशिक मध्ये, पूर्व आणि पश्चिम मतदारसंघासाठी  इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. या वेळी मुलाखती साठी विद्यमान आमदारांसोबत अनेक उमेदवार उपस्थित होते. 

भाजपा वसंत-स्मृती कार्यालय, नाशिक येथे भाजपा तर्फे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती नगरविकास राज्यमंत्री तथा नाशिक विधानसभा निरीक्षक ना.योगश सागर यांच्या उपस्थितीत संपन्न झाल्या. यामध्ये प्रमुख म्हणजे शहरातील सर्व जागा या भाजपाच्या हाती असून, पूर्ण बहुमतात मनपातील भाजपाची सत्ता आहे. तर तर देवळा मतदार संघ हा शिवसेनेचा आमदार आहे.  भाजपच्या हाती तिन्ही जागा असल्याने पुन्हा या जागा निवडणूक आणने याचा दबाव असणार आहे. अय आगोदर राज ठाकरे यांचा प्रभाव होता तेव्हा मनसेचे तिन्ही आमदार निवडणून आले होते. मात्र यावेळी मनसे निवडणूक लढवणार असून, त्यासाठी मनसेने तयारी सुरु केली आहे.  

तत्पूर्वी कोअर कमिटीची बैठक नगरविकास राज्यमंत्री तथा नाशिक विधानसभा निरीक्षक ना.योगश सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनिल बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीष पालवे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सरचिटणीस पवन भगुरकर, काशिनाथ शिलेदार, उत्तमराव उगले, संभाजी मोरुस्कर, आ.बाळासाहेब सानप, आ.सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, सभागृह नेता सतीश  सोनवणे, गटनेता जगदीश पाटील उपस्थित होते.

मतदार संघ निहाय इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुलाखती खालील प्रमाणे.
नाशिक पूर्व विधानसभा – आ.बाळासाहेब सानप ( विद्यमान आमदार ), सुनील केदार, अरुण पवार, उध्दव निमसे,  प.पु.स्वामी प्रा.डॉ.तुळशीरामजी गुट्टे, हेमंत धात्रक, उत्तम उगले, कमलेश बोडके, सुनिल आडके, दिनकर आढाव, ॲड. मुकुंद आढाव, कांचन खाडे, बाळासाहेब पालवे, संभाजी मोरुस्कर, दामोदर मानकर, जगदीश गोडसे

नाशिक मध्य विधानसभा – आ.देवयानी फरांदे ( विद्यमान आमदार ), लक्ष्मण सावजी, वसंत गिते, आशिष नहार, विजय साने, सुरेश पाटील, हिमगौरी आहेर-आडके, शिवाजी गांगुर्डे, गणेश कांबळे, कुणाल वाघ, सुनील खोडे
नाशिक पश्चिम विधानसभा – आ.सीमा हिरे ( विद्यमान आमदार ) , प्रदीप पेशकार, दिनकर पाटील, शशिकांत जाधव, कैलास आहिरे, अलका आहिरे, अनिल जाधव, सतिष सोनवणे, बाळासाहेब पाटील,  प्रशांत कोतकर, विक्रम नागरे, मुकेश शहाणे, निर्मला पवार, मयुर अलई, जगन पाटील, दिलीपकुमार भामरे, छाया देवांग या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. मुलाखती अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.