नाशिक – राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा दयावा. या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने रविवार कारंजा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देवून जो धक्कादायक खुलासा केला. त्यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. म्हणूनच सचिन वाझे यांची नियुक्ती करावी असा त्यांचा आग्रह होता. असा खुलासा या पत्राव्दारे परमबीर सिंग यांनी केला. या घटनेचा भाजपाने अत्यंत तीव्र निषेध केला असून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासह राज्य सरकार बरखास्त करण्याचे व महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागु करण्याची मागणी यावेळी केली आहे.BJP nashik
अबतो ये स्पष्ट है, ठाकरे सरकार भ्रष्ट है…. दिलाच पाहिजे… दिलाच पाहिजे… राजीनामा दिलाच पाहिजे…. शिवरायांच्या महाराष्ट्रात खंडणी मागणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… लागु करा… लागु करा…राष्ट्रपती राजवट लागू करा. धिक्कार असो… धिक्कार असो… खंडणी पॅटर्नचा धिक्कार असो… अशा जोरदार घोषणा आंदोलन करते वेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.
या आंदोलना प्रसंगी भापाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, शहर सरचिटणीस सुनिल केदार, महिला आघाडी अध्यक्षा हिमगौरी आडके, सचिव अमित घुगे, संतोष नेरे, ॲड.अजिंक्य साने,ॲड.सुनील दराडे, प्रदिप पेशकार, प्रा.कुणाल वाघ, सुनिल बच्छाव, नंदकुमार देसाई, भास्कर घोडेकर, निलेश बोरा, अविनाश पाटील, चंद्रशेखर पंचाक्षरी, हेमंत गायकवाड, ज्ञानेश्वर काकड,अमोल इघे, विजय बनछोडे, शिल्पा पारनेरकर, ललिता बिरारी, करुणा गायकवाड, शोभा जाधव, हर्षा फिरोदिया, प्रतिक शुक्ल, वसंत उशीर, नवनाथ ढगे, बबलू सिंह परदेशी, मनिष बागुल, पवन उगले, सुमित नहार, अर्चना दिंडोरकर, गणेश अवनकर, अलका जांभेकर, ऋषिकेश आहेर, कोमल मेहरोलिया, नितीन माळोदे, रुची कुंभारकर, दिगंबर धुमाळ, सोमनाथ बोडके, सुरेश खेताडे, महेश महंकाळे, निखिलेश गांगुर्डे, ऋषिकेश डापसे, ॲड.शाम घरोटे, शशिकांत शेट्टी, धनंजय पुजारी, अंबादास पगारे, राजेंद्र महाले, प्रसाद धोपावकर, केदार शिंगणे, राजश्री शौचे, रुपाली नेर, रश्मी कुलकर्णी, विलास कारेगावकर, किर्ती शुक्ल, ऋषिकेश ठाणगांवकर, विनायक कस्तुरे, रविंद्र गांगोले, विपुल सुराणा, मनिषा बागुल, विनोद खरोटे, विपूल महेता, गौरव बोडके, मोहण गायधनी, भगवान काकड, जयंत नारद, आबा पवार, स्वाती कुलकर्णी, प्रशांत वाघ, गौतम हिरण, गणेश मोरे, राम ढोबे, रेखा निकम, सुदर्शन काकड, स्मिता मुठे, अशोक गवळी, विशाल पगार, राजनंदीनी आहिरे, विजय मोहिते, रवी भोर, धनंजय माने, गौरव शहाणे, निखील गांधी, प्रथमेश शिंगणे, डॉ.चेतन जाधव, महेश सदावर्ते आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नाशिक (सिडको) येथे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. तसेच ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.BJP nashik