BJP Maharashtra ओबीसी नेते नाराज, खडसे यांची भेट -भुजबळ

राज्यातील असलेल्या राजकीय स्थितीवर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की आज भाजपत ओबीसी नेते नाराज आहेत. तर त्यांच्या पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे मला भेटले आहेत अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते , मंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकारांना दिली आहे. छगन भुजबळ यांनी राज्याच्या  मंत्रीपदी निवड झाल्यानंतर प्रथमच नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्यांच्या भेटीला आले होते. त्यांच्या भेटीनंतर भुजबळ फार्म येथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी  ही माहिती दिली आहे.(BJP Maharashtra)

भुजबळ यांनी भाजपातील अंतर्गत संघर्षाला दुजोरा दिला आहे. भाजपातील  नाराज जेष्ट नेते माजी मंत्री एकनाथ खडसे हे  आपल्याला भेटले आहेत, सोबतच त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे. तर पुढे बोलतांना ते म्हणाले की खडसे कोणाला भेटले म्हणजे त्या पक्षात त्यांनी प्रवेश केला असे होत नाही. एकनाथ  खडसे हे फार  अनुभवी नेते आहेत, ते योग्य निर्णय घेतील असे सांगतानाच भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची नाराजी हा भाजपाच अंतर्गत प्रश्न असल्याचे स्पष्ट केले. 

मंत्री मंडळ वाटपावरून त्यांना विचारले असता ते म्हणाले की , सत्तांतरानंतर खाते वाटप हा पूर्णत: मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. पुढील दोन दिवसात यासंदर्भातील प्रश्न मिटतील असे त्यांनी सांगितले. तर अजित पवार यांच्यावर बोलतांना भुजबळ म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांना देण्यास माझा कोणताही विरोध असण्याचे कारण  नाही. मात्र उपमुख्यमंत्रीपदी कोणाला संधी द्यावी हा सर्वस्वी निर्णय स्वतः नेते शरद पवार यांचा अधिकार आहे. या नव्या सरकारवर होऊ लागलेल्या टीकेसंदर्भात बोलताना भुजबळ यांनी या सरकारमध्ये सर्व पक्षातील अनुभवी नेते आहेत. त्यामुळे सरकारला थोडा वेळ द्या आणि मगच टिका करा असेही ते म्हणाले आहे.

भुजबळ यांची भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी घेतली भेट

नाशिकमध्ये राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी भेट घेतली आहे. वसंत गिते हे शिवसेनेत होते तेव्हा पासून  छगन भुजबळ यांचे संबंध आहेत. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी नाशिक येथे भुजबळ यांच्या निवासस्थानी छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ दिले. ही केवळ सदिच्छा भेट होती. भुजबळ यांच्याशी आपले पक्ष विरहीत नाते असून ज्येष्ठत्वाच्या नात्यावर त्यांनाच पालकमंत्रीपद मिळावे अशी इच्छा गिते यांनी व्यक्त केली.(BJP Maharashtra)

भुजबळ यांचे नाशिकमध्ये जोरदार स्वागत व्हिडियो !
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.