पावसात महाजनादेश यात्रा, विरोधकांचा संताप केले विना नोटीस स्थानबद्ध

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  सुरु असलेली  महाजनादेश यात्रा शेवटच्या टप्प्यात बुधवारी नाशिकमध्ये दाखल झाली. यावेळी मुसळधार पावसामध्ये रोड शो आणि बाइक रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात केले. यात्रा मार्गावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ढोल, नृत्य यांचेही सादरीकरण करण्यात आले.  सोबत दुसरीकडे  मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यात्रा मार्गावर काळे फुगे सोडून यात्रेला विरोध नोंदविला. तर शिक्षणाच्या प्रश्नावर काही तरुणांनी मुख्यमंत्र्यांना फलक दाखविण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले.

सोबतच विरोधकांना पोलिसांनी कोणतीही नोटीस न देता त्याब्यात घेतले असा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधी नेत्यांना पोलिसांनी सकाळपासूनच स्थानबद्ध केले होते. त्यामुळे अनेकांनी आपला सरकार विरोधात संताप व्यक्त केला आहे.

यात्रेच्या सुरुवातीला शहरातील पाथर्डी फाटा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत झाल्यानंतर दुचाकी रॅली काढण्यात आली. सुमारे पाच हजार दुचाकीस्वार भाजपाचे झेंडे आणि ध्वज घेऊन रॅलीत सहभागी झाले आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर रॅलीत सहभागी झाले.

सिडकोमार्गे मोटारसायकल रॅली गोल्फ क्लब येथे आल्यानंतर त्र्यंबकनाका येथून रोड शो ला  सुरुवात झाली. काही ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तर काही चौकात युवतींचे लेजीम पथकाने स्वागत केले.  रोड शो ऐन रंगात आलेला असतांना पंचवटी कारंजा येथे  जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र भरपावसातही रोड शो सुरूच राहिला. यात्रेला मुख्यमंत्र्यानी संबोधित केले.  

आता तयारी विजय यात्रेची- मुख्यमंत्री
नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेचा समारोप होत असला तरी आता विजयी यात्रेची तयारी सुरु होत असल्याचे मुख्यमंत्री यांनी  यात्रेला संबोधित करतांना सांगितले.   विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकवून पुन्हा नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे दर्शन आणि तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार असल्याचे सांगत जनतेचा आशिर्वाद हाच महाजनादेश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आता कुठलेही भाषण करणार नसल्याचे सांगत थेट लोकांनां प्रश्न विचारत संवाद साधला. 

परदेशातून कांदा आयात करण्याच्या निर्णयाला विरोध करत शेतकऱ्यांनी आणि विविध संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वाहनांवर कांदे फेकण्याचा आणि यात्रा अडवण्याचा इशारा दिला आहे. मात्र या आंदोलनाचा इशारा देणाऱ्या काही जणांना ताब्यात पोलिसांनी घेतलं आहे. तर काहींना स्थानबद्ध केलं आहे.

काल रात्री उशिरा 15 जणांना स्थानबद्द करण्यात आलं आहे. तर परिवर्तनवादी संघटना, आप युवा आघाडी, प्रहार जनशक्ती, छात्रभारती संघटनांनी गनिमी काव्यानं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्यासह 22 जणांना आज पहाटेच पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतं. दरम्यान आतापर्यंत पोलिसांनी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या 62 जणांना स्थानबद्ध केल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा उद्या नाशिकमध्ये होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून 125 आंदोलकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.

पाकिस्तानसह इजिप्त, चीनमधून कांदा आयात करण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा, अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वाहनांवर कांदेफेक करण्याचा तसेच यात्रा अडवण्याचा इशारा शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी दिला आहे.

प्रतिक्रिया : –

Raju Desale

मुख्यमंत्री भेट हवी होती कारण आशा गटप्रवर्तक यांना मानधन वाढींपासून अनेक दिवसांपासून वंचित आहेत. त्यांना मानधन वाढ द्यावी या करिता भेट हवी होती. तर उद्या पंतप्रधान येणार आहेत त्यांना एपीएस 95 पेंशन धारक सेवानिवृत कामगार ना पेंशन वाढ आश्वासन प्रमाणे  निर्णय घ्या या साठी भेट मागितली होती, मात्र पोलिसांनी आम्हाला अटक केली आहे याचा आयटक व भाकप जाहिर निषेध करीत आहोत. दोन दिवस ताब्यात ठेवणे निषेध

– राज्य सचिव कॉमरेड राजू देसल

Vijay Thakrey

भाजप सरकार हे जुलमी सरकार आहे, आम्हाला कोणतीही माहिती, पूर्व नोटीस ने देता स्थानबद्ध करवून ठेवण्यात आले आहे. असे करून सरकाराला कोणता फायदा होणार आहे. नागरिकांच्या आणि विरोधकांच्या रोषाला सरकारला सामोरे जावेच लागणार आहे. या प्रकारे पोलिस यंत्रणेवर दबाव टाकून अश्या प्रकारे वागणे हे चुकीचे आहे. आम्ही या जुलमी सरकारचा निषेध करत आहोत.

– विजय ठाकरे , महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.