भाजपा उमेदवारांनी अर्ज भरले महापौर निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहणार

नाशिक महापालिका निवडणूक
महापौर निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहणार निवड बिनविरोध होण्याची शक्यता मावळली
नाशिक :नाशिक महापालिकेच्या महापौरपदासाठी भारतीय जनता पार्टीकडून गुरुवारी रंजना भानसी तर उपमहापौरपदासाठी प्रथमेश वसंत गितेयांनी अर्ज दाखल केले आहेत. तर कॉँग्रेस आघाडीकडून महापौरपदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडून आलेल्या एकमेव नगरसेवक आशा तडवी यांचा अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडून उपमहापौरपदासाठी सुषमा पगारे यांनी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे शिवसेनेनेचा कोणताही नगरसेवक मतदान करणार नसल्याचे समजते. त्यामुळे सुरुवातीला बिनविरोध वाटत असलेली निवड मात्र आता होणार नाही असे स्पष्ट झाले आहे. 
येत्या १४ तारखेला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने ६६ जागा मिळवत बहुमत मिळाले आहे. महापौरपदासाठी बहुमतातील ६२ जागांची आवश्यकता होती. त्यामुळे आधीच भाजपने विजयी आकडा पार केला आहे. तर शिवसेना ३५ जागा घेवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी ६ जागा मिळवल्या आहेत. तर मनसेच्या ५ जागा निवडून आल्या आहेत. भाजपकडे बहुमत असल्याने महापौर व उपमहापौर हे भाजपचेच होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. अशावेळी सुरुवातीला निवड बिनविरोध होईल असे वाटत होते. मात्र महापौर पदासाठी तडवी आणि उपमहापौर पदासाठी पगारे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. 
दुसरीकडे नाशिकच्या विकासासाठी शिवसेना नाशिक महानगरपालिकेत महापौर निवडणूक लढवणार नसून सेनेचा कोणताही नगरसेवक मतदान करणार नसल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली आहे. नाशिकच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. मुंबई काय झाले आम्हाला माहित नाही. मात्र नाशिकमध्ये महापौर प्रक्रियेत शिवसेना सहभागी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मनसेही या निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याचे समजते. त्यामुळे आता थेट कॉंग्रेस, राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत बघावयास मिळणार आहे.
 
 
 भारतीय जनता पार्टीकडून महापौरपदासाठी रंजना भानसी तर उपमहापौरपदासाठी प्रथमेश वसंत गिते यांनी अर्ज दाखल केले. 
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.