खुनाचा आरोप मिळाला जामीन, मग जुगार खेळून पसार, आता या भाजपा नगरसेवकाला करणार तडीपार

नाशिक : वेगळेपण दाखवत असेलल्या आणि  ‘पार्टी विथ डिफरन्स’ स्वतः  म्हणवणाऱ्या भाजपचा पक्षाचा नाशिक येथील  जुगारी नगरसेवक हेमंत अण्णा शेट्टी अजूनही  फरार आहे. पोलिसांनी त्याच्या एकूण प्रताप पाहतात त्याच्या विरोधात  शासनाकडे तडीपारीचा प्रस्ताव पाठवला आहे. विविध पोलिस ठाण्यात हेमंत शेट्टीवर  हत्येसह एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत.

मागच्या सोमवारी हेमंत अण्णा शेट्टी सात साथीदारांसह 52 पानी पत्त्यांच्या कॅटवर पैसे लावून ‘अंदर बाहर’ नावाचा जुगार खेळत होता. त्यावेळी पंचवटीतील वाल्मिकनगर या त्याच्या प्रभागात असलेल्या  मोकळ्या जागी एका झाडाखाली हा सर्रास पणे सुरु होता.  गुन्हे शाखा एकच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला, मात्र हे बघताच शेट्टी आणि त्याच्या दोन मित्रांनी तिथून पळून जाण्यास यशस्वी ठरला होता. जुगार अधिनियम कायद्याअंतर्गत या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काही महिन्यांपूर्वी हेमंत शेट्टी हा एका हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

खुनाचा गंभीर आरोप 

पंचवटीतील सराईत गुन्हेगार ज्वाल्या ऊर्फ जालिंदर उगलमुगले याची २०१५ मध्ये घोटी परिसरात हत्या झाली होती. हेमंत शेट्टीने राकेश कोष्टी, कुंदन परदेशी, अविनाश कौलकर यांच्यासह इतर काही साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केल्याचे दोन ते अडीच वर्षांनी पोलिस तपासात समोर आले होते. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी शेट्टीला अटक केली होती. हायकोर्टाच्या आदेशानुसार शेट्टीला जामीन देण्यात आला. जुगार अड्डे, हत्या यासह इतर काही गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या नगरसेवक शेट्टीविरुद्ध पंचवटी पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार केला. इतर जवळपास ३० सराईत गुन्हेगारही तडीपारीच्या वाटेवर आहेत. याबाबत सध्या पोलिस आयुक्तालयात खल सुरू असून, पुढील आठवड्यापर्यंत याबाबत आदेश होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.