ylliX - Online Advertising Network

भाजप पदाधिकाऱ्यांनी लावले महावितरणच्या कार्यालयाला टाळे

नाशिक (प्रतिनिधी): वीजबिल दरवाढी विरोधात भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे. शुक्रवारी सकाळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शरणपूर रोड येथील महावितरणच्या कार्यालयात आंदोलन केले. यावेळी पदाधिकाऱ्यांना गेटवर अडवल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. यावेळी राज्यसरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या आणि त्यानंतर महावितरणच्या कार्यालयाला टाळे लावण्यात आले. वीजबिल दरवाढ कमी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.BJP agitation

कोरोनाकाळात आलेले अवाजवी वीजबिल भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही. विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीजबिल भरण्याच्या अवस्थेत नाही. अवाजवी बिले दुरुस्त करण्याची घोषणाही प्रत्यक्षात आली नाही. कोरोना प्रसारापूर्वी महाविकास आघाडीच्या ऊर्जामंत्र्यांनीच १०० युनिट पर्यंतचे वीजबिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, हे आश्वासनही प्रत्यक्षात आले नाही. जर दिलेली आश्वासने पूर्ण करायची हिंमत महाविकासआघाडी सरकारमध्ये नसेल तर निदान अशी सक्तीने वीजबिले वसुली करणे, थांबवावे अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरून जन आंदोलन करेल अशा इशाराही देवयांनी फरांदे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

 

bjp agitation
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सावजी, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष हिमगौरी आडके, नगरसेवक प्रशांत जाधव, स्वाती भामरे, देवदत्त जोशी, हरिभाऊ लोणारी, गणेश कांबळे, अमित घुगे, पवन भगुरकर, देवा जाधव आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महावितरणने वीजबिल न भरल्यास ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवली असून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणच्या व महाराष्ट्र सरकारच्या निषेधार्थ आज शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालय, तिबेटीयन मार्केट येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने #टाळा_ठोको_हल्लाबोलआंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.BJP agitation
कोरोना काळात अवाजवी वीज बिल आल्यावर ती बिलं भरण्याची क्षमता सामान्य
माणसाकडे नाही. विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीज बिल भरण्याच्या अवस्थेत नाही. अवाजवी बिलं दुरुस्त करण्याची घोषणाही प्रत्यक्षात आली नाही. कोरोना प्रसारापूर्वी महाविकासआघाडीच्या ऊर्जामंत्र्यांनीच १०० युनिट पर्यंतचे वीज बिलं माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासनही प्रत्यक्षात आले नाही. जर दिलेली आश्वासने पूर्ण करायची हिम्मत महाविकासआघाडी सरकार मध्ये नसेल तर निदान अशी सक्तीने वीज बिलं वसूली करून आधिच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना आणि सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकू नये.
तसेच राज्यातील ७२ लाख वीज जोडण्यांचा पुरवठा खंडीत करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरीत मागे घ्यावा. निर्णय मागे न घेतल्यास भारतीय जनता पार्टी रस्त्यांवर उतरून पुन्हा आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे महाविकासआघाडी सरकारला दिला.
यावेळी भाजप ज्येष्ठ नेते लक्ष्मणजी सावजी, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा
सौ. हिमगौरी आडके, मध्य पश्चिम मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी, सरचिटणीस तथा नगरसेवक प्रशांत जाधव, सरचिटणीस पवन भगूरकर मा. नगरसेवक हरिभाऊ लोणारी, नगरसेविका स्वाती भामरे, आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.BJP agitation
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.