बिटकॉईन अर्थात वर्चुअल मनी विरोधात गुन्हा दाखल कंपनी सहकारी विरोधात गुन्हा आणि इतर ५ ताब्यात
नाशिक : आपल्या देशात अनधिकृत असलेले बिटकॉईन अर्थात वर्चुअल मनी (पैसे ) व्यवहार प्रकरणी नाशिक पोलिसानी ५ संशयिताना ताब्यात घेतले असून, कंपनीवरही गुन्हा नोंदवला आहे. या संशयिता विरोधात सायबर पोलिस ठाणे येथे चिटस आणि मनी सर्क्युलेशन स्किम्स (बॅनिंग) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या सर्व ५ आरोपींना आज कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २४ मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.
नाशिक पोलिसांनी १.कुलदीप लखू देसले, सातपूर,२. निषेद महादेव वासनिक, नागपूर, ३. दिलीप प्रेमदास बनसोड, पाथर्डी फ़ाटा, नाशिक, ४. आशिष शंकर सहारे अहमदनगर, ५. रोमजी बीन अहमद, मलेशिया या सर्वाना अटक केली आहे. तर www.thefuturebit.com कंपनी आणि इतरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भारतामध्ये कायदेशीर चलन म्हणून आधिकृत मान्यता नसतानां बिटकॉईन अर्थात वर्चुअल मनी खरेदी विक्री करत, मल्टी लेव्हल मार्केटिंग पद्धतीने नागरिकांना मोठा आर्थिक परतावा देण्याचे आमिष दाखवणे तर सेमिनारचे आयोजण करत नागरिकांना हे विकत घेण्यास प्रवृत्त केले गेले आहे. यामध्ये पोलिसांनी विविध पेपर्स, ब्राउचार, सभासद नोंदणी फॉर्म, बिटकॉईन अर्थात वर्चुअल मनी यामध्ये सिम्बॉल, बिटकॉईन अर्थात वर्चुअल मनी लोगो, सर्टिफिकेट, आय फोन असे एकूण ९४ हजार रु. मुद्देमाल जप्त केला आहे.
बिटकॉईन म्हणजे काय ?
बिटकॉईन हे एक आंतरजालीय चलन आहे. या चलनाद्वारे पैसे जगभरात पाठवता येतात. ही एक क्रिप्टॉग्राफी प्रकारातील हॅशींग ही कल्पना वापरून तयार केलेली योजना आहे. बिटकॉईन सुरक्षित, जागतिक आणि करमुक्त चलन आहे यावर काही लोकांचा विश्वास बसल्याने या चलनाची लोकप्रियता आणि मूल्य वाढते आहे. इ.स. २१४० मध्ये नवीन बिटकॉईन निर्माण होण्याचे थांबणार आहे असे मानले जाते.august 2013 अखेर जगात bitcoin ने होनारया व्यवहरांची संख्या 1.5 बिलियन dolar गेली होती.बिटकॉईन हे निरर्थक आहे कारण सोन्यासारखे त्याला भौतिक अस्तित्व नाही अशी टीका या चलनावर केली जाते.