येवला :- (वार्ताहर – विलास कांबळे) येवला तालुक्यातील गारखेडे गणेशवाडी परिसरातील अनेक गावांच्या शिवारातील विहीरी कुंपण लिकांच्या पाणी पातळी खालावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.गेल्या दोन वर्षपासून अल्प प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे विहिरींची पाणी पातळी खालावली आहे खरीप हंगामत जेमतेम उत्पादनावर समाधान मानवे लागलेल्या शेतकरी वर्ग्याने रब्बी हंगामावरही लक्ष्य केंद्रित केले होते.
मात्र पाण्याअभावी रब्बी हंगामातही त्यांना फारसे उत्पादन प्राप्त होऊ शकले नाही गेल्या महिन्यापर्यंत परीसरातील विहिरींना बऱ्यापैकी पाणी होते.मात्र या महिन्यात तापमान 44′ सेलसीअस वाढल्याने विहरी कोरडाठाक झाल्या आहेत गावाच्या बाजूला अंगुलगाव च्या डोंगर रांगेतील पाणी साठें आटल्याने वन प्राणी, हरण, तसेच पशुपक्षी पाण्याच्या शोधार्थ गावाकडे धाव घेत आहेत अंगुलगाव,गारखेडे, गणेशवाडी आदी गावांमध्ये वन्य प्राणी पाण्या साठी येत आहेत भूगर्भातील पाण्याच्या पातळीत सुरवातीपासूनच फारशी वाढ या वर्षी झालेली नव्हती त्यातच आता उन्हाचे चटके तिर्वतेने जाणवू लागले आहेत परिसरातील विहिरीच्या पाण्याची पातळी हि उन्हाच्या तिर्वतीने कोरडा ठाक पडलेल्या आहेत. काही विहिरींनी तळ घाटल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे
दरम्यान गावाच्या मळे वस्ती वरील नागरिकांना पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांना पिण्यासाठी पाणी शोधत फिरावे लागते आसल्याचे चित्र परिसरात आहे त्यामुळे टंचाईच्या झळांचा समाना पशुधना ला हि करावा लागत दिसत आहे.
”पाण्यासाठी व्याकुळ झालेले हे वन्यप्राणी अत्यंत कसरत करीत कशी बशी आपली तहान भागवत आहे. इतके उष्णता कधी नसतो पण दोन वर्षे पासून पाऊस कमी पडल्याने नदी- बंधारे न भरल्याने हि हाल आम्हला सोचवावी लागत आहे”
– विजय खैरनार, सामाजिक कार्यकर्ते, गारखेडे.
Advertise With us, Connect with Us on Whats App : 8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi,Your Name, City or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).
Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb
Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb
Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/
आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! NashikOnWeb.news@gmail.com