नाशिक शहर परिसरात मोटार सायकल जाळण्याचे सत्र सुरुच आहे. गुरुवारी (दि.19) मध्यरात्री रविवार पेठेत समाज कंटकांनी राहत्या घरासमोर उभी केलेली दुचाकी जाळल्याची घटना घडली. Bike burnt Ravivar peth old Nashik sarkarwada police
सागर दिनकर चौघुले (32, रा. रमेश बिल्डींग, अभोणकर लेन, रविवार पेठ) यांच्या घरासमोर दुचाकी (एम. एच.15, डी. बी.7137) पार्किंग केली होती. मध्यरात्री त्यांना घराबाहेर मोठा आवाज झाल्याने चौघुले यांनी भावर धाव घेतली. तेव्हा त्यांना त्यांची दुचाकी जळताना दिसली. त्यांनी तात्काळ पाणी टाकत आग विझवली. यामध्ये गाडीचे हँडल आणि दर्शनी मडगाईचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.
या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोपींचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी रविवार पेठेतील रहिवाश्यांनी केली आहे.