ylliX - Online Advertising Network

नाशिकमध्ये ३० वर्षे रहिवासी बिहाऱ्याला मराठी येत नाही, पंतप्रधानांनी व्यक्त केली नाराजी!!!

नाशिक : प्रशासकीय गलथान कारभाराचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा बसला आहे. हा सर्व प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्र असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्राच्या व्हिडियो कॉन्फरन्स मध्ये नेहमी प्रमाणे सर्वाना धक्का देत नाशकातील व्यापाऱ्या सोबत मराठीत संभाषण करायला सुरुवात केली. Bihari Bhaiyya 30years Nashik Deolali Resident can’t speak marathi PMModi

मात्र जो व्यापारी होता, तो निघाला बिहारचा. त्याला मराठी काही कळेना. मग पंतप्रधान यांनी विचारले किती वर्षापासून नाशिकमध्ये राहता? त्यावर त्याने ३० वर्षे असे सांगितले. तेव्हा पंतप्रधान साहेबांनी, तरीही तुला मराठी बोलता येत नाही? असे विचारात आपली नाराजी त्यांनी व्यक्त केली.

परंतु हे प्रकरण इथेच थांबले नाही. या व्ही. सी. ची क्लिप सध्या वायरल झाली असून प्रशासनावर जोरदार टीका होत आहे. Bihari Bhaiyya 30years Nashik Deolali Resident can’t speak marathi PMModi

मंगळवारी मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे थेट संवाद साधताना महाराष्ट्रातील नाशिकच्या लाभार्थ्याशी बातचीत केली.

मुद्रा योजनेतील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संवाद साधता यावा यासाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केले होते. राज्यातील लाभार्थ्यांशी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला होता. Bihari Bhaiyya 30years Nashik Deolali Resident can’t speak marathi PMModi

महाराष्ट्रातील नाशिक शहर निवडण्यात आले होते. नाशिक मधल्या सेंटरवर काही लाभार्थी जमले होते. यामध्ये एक लाभार्थी होते हरी ठाकूर. मोदींनी त्यांचे नाव घेतले आणि नाशिकचा म्हणजे त्याला मराठी येणारच असं गृहित धरून त्यांनी थेट मराठीतून हरी ठाकूर यांचं ‘हरिभाऊ’करत बोलण्यास सुरुवात केली होती.

NashikNews : विवाहिता तरुणीची सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या, पतीला अटक

मात्र बिहारी ठाकुर बुचकळ्यात पडला. त्याला ओ की ठो कळले नाही. पंतप्रधान इतके चांगले मराठी बोलत होते की त्याला त्यांना काय उत्तर द्यावे ते कळत नव्हते. तर एका ठिकाणी उभे असलेल्या ठाकूरला मोदींनी ‘बसा… बसा…’ असं म्हटल्यावर त्याला ते ही कळलं नाही. मग बाजूला बसलेल्या अन्य लाभार्थ्यांनी त्याला खाली बसवलं. Bihari Bhaiyya 30years Nashik Deolali Resident can’t speak marathi PMModi

मग पंतप्रधान मोदी यांनी विचारल की, मराठी येतं की नाही? असं विचारल्यावर त्यांनी ‘नाही’असं उत्तर दिलं आणि मोदींची फजिती झाली.

किती वर्ष येथे राहता या प्रश्नावर ठाकूरने ३० वर्ष उत्तर दिले. यावर मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आणि उपरोधिकपणे वा वा असे म्हटले. तर दुसरीकडे नेटकरी वर्गाला ही क्लिप मिळाली मग बिहारी आणि उत्तर भारतीयांवर तोंड सुख घेत अनेकांनी स्थानिक प्रसासानाला चांगलेच धारेवर धरले आहे. Bihari Bhaiyya 30years Nashik Deolali Resident can’t speak marathi PMModi

पंतप्रधान मोदी आणि हरि ठाकूर यांच्यात झालेल्या संवादाची सुरुवात पुढील प्रमाणे होती:

पंतप्रधान मोदी: हरिभाऊss…हरिभाऊ बोला काय म्हणताय??

हरि ठाकूर: नमस्ते सर

पंतप्रधान मोदी: नमस्ते… काय म्हणताय…

हरि ठाकूर: ठीके सर.

पंतप्रधान मोदी: बसा… बसा… बसा… (हरि ठाकूर यांना काहीच  कळालंच नाही, इतर लाभार्थ्यांनी त्यांना खाली बसवलं) हा बोला..

हरि ठाकूर: जी मुजफ्फरपूर रहनेवाला हूँ.. हरि ठाकूर… नासिक में ३० साल से रहतां हूँ सर…

पंतप्रधान मोदी: तुला मराठी येतायत की नाई???

हरि ठाकूर: नाई सर…

पंतप्रधान मोदी: वाह… एकदम (या पुढे मोदी नक्की काय शब्द बोलले ते कळतच नाही)

या नंतर पुढील सर्व संवाद हा हिंदीतूनच झाला.

Bihari Bhaiyya 30years Nashik Deolali Resident can’t speak marathi PMModi
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.