ylliX - Online Advertising Network

भुजबळ काका-पुतण्यांच्या जामिनाची सोशल मिडियावर अफवा!

सोशल मीडियावर जुन्या बातमीचा व्हिडीओ व्हायरल! निकटवर्तीयांची खुलाश्यासाठी धावपळ

नाशिक : नाशिक म्हटलं की वाईन, मंदिरे, कुंभमेळा असे विषय समोर येतात आणि नाशिकच राजकारण म्हटलं कि भुजबळांच्या नावाला मोठे वलय आहे. याचाच फायदा घेत एका चॅनेल वर आलेला दोन वर्षे जुना व्हिडिओ खोडसाळपणे व्हायरल करण्यात आला. व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे भुजबळ समर्थकांची मोठी धावपळ झाली. ही अफवा असल्याचा खुलासा करताना मात्र भुजबळ समर्थकांची दमछाक झाली. Bhujbal’s bail social media Rumor spread monday 8th jan 2018

दिल्लीत बांधलेले महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले नाशिकचे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला, अशी अफवा सोमवारी (दि.८) दिवसभर नाशकात होती. याप्रकरणी दाखल एका तक्रारीत दोन वर्षांपूर्वी न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. त्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ एका वाहिनीवर त्यावेळी प्रसारित करण्यात आली होती. तोच व्हिडीओ सोमवारी सकाळपासून नव्याने व्हॉट्स ॲपवर व्हायरल झाला.

याची विचारणा करण्यासाठी लोक थेट भुजबळ फार्मवर येत संपर्क करत विचारणा करण्यास सुरुवात केली. अखेर भुजबळांच्या निकटवर्तीयांनी ही अफवा असल्याचा जाहीर खुलासा केला.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.