ylliX - Online Advertising Network

आंदोलनाच्या तयारीसाठी भुजबळ समर्थक समन्वय समितीकडून तालुकावार बैठका सुरु

नाशिक: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर सरकारकडून सूड बुद्धीने होत असलेल्या कारवाई विरोधात सरकारवर रोष व्यक्त करण्यासाठी देशभरात एकाच वेळी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय व तालुकास्तरावर तहसील कार्यालयासमोर मंगळवार दि.२ जानेवारी २०१७ रोजी ११ वाजता लोकशाही मार्गाने निदर्शने करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी भुजबळ समर्थक समन्वय समितीकडून नाशिक जिल्ह्यात तालुकावार बैठका घेण्यात येत असून यात भुजबळ समर्थकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

दि.२९ डिसेंबर रोजी भुजबळ समन्वय समितीची मुख्य बैठक नाशकात पार पडली. या बैठकीत दि.२ जानेवारीच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. त्यानंतर भुजबळ समन्वय समितीकडून नाशिक जिल्ह्यात तालुकावार बैठका घेण्यात येत आहे. या बैठकांना भुजबळ समर्थकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी शहर व जिल्ह्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी आपला पाठींबा दर्शविला आहे. ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती भुजबळ समन्वय समितीकडून देण्यात आली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.