भूजबळांवरील अन्यायाच्या विरोधात लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा निर्णय

अन्याय पे चर्चेतील बैठकीत समर्थकांचा सूर

नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आज नाशिकचे माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या निवासस्थानी झालेल्या ‘अन्याय पे चर्चा’ या बैठकीत न्यायालयीन लढाईसोबतच लोकशाही मार्गाने सुरु असलेला लढा अधिक तीव्र करण्याची गरज असल्याचा समर्थकांच्या चर्चेत सुरु निघाला. यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, गोकुळ पिंगळे, अॅड.संदीप गुळवे, जि.प.सदस्य हिरामण खोसकर, आदी भुजबळ समर्थक उपस्थित होते.

यावेळी झालेल्या अन्याय पे चर्चेत भुजबळांवर होत असलेल्या अन्यायावर चर्चा करून उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या भावना व्यक्त करतांना माजी महापौर गुरुमित बग्गा म्हणाले की, आजवर देशाच्या इतिहासात विरोधी पक्षातील नेत्यांवर कधीही सूड बुद्धीने कारवाई झालेली नाही. त्यातले त्यात महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते आत्ता पर्यंत कुठल्याही  विरोधी पक्षाच्या नेत्यावर लोकशाहीची तत्व पायदळी तुडवून कारवाई झालेली नाही. मात्र सद्या लोकसंघटन करणाऱ्या व अन्यायाला वाचा फोडणाऱ्या नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रात छगन भुजबळ यांच्यासारख्या बहुजन व विकासाची दृष्टी असलेल्या नेत्यावर सूड बुद्धीने कारवाई केली जात आहे. सरकारी यंत्रणेला भुजबळांविरोधात कुठलेही ठोस पुरावे मिळत नसल्याने त्यांना सरकार कडून तुरुंगात डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा भावना यावेळी बग्गांसह  उपस्थितांनी व्यक्त केल्या.

तसेच सद्या देशातील व्यवस्थेच्या विरोधात जो नेता आवाज उठवेल त्याला कुठल्यातरी मार्गाने अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारी बाब आहे. तरी देखील यासर्व प्रकरणातून छगन भुजबळ तावून सुलाखून निर्दोष बाहेर येतील अशी यावेळी चर्चा झाली. तसेच भुजबळांवर होणाऱ्या अन्यायावर पत्रके वाटण्यात यावी असाही सूर उपस्थितांकडून निघाला. तसेच कायदेशीर लढाई अधिक तीव्र करत सामान्य जनतेच्या न्यायालयात जाण्याचा सुर यावेळी निघाला.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.