ylliX - Online Advertising Network

चोवीस तासात १८ इंच वाढणारी बीमा बांबुची ही नवीन जात

चोवीस  तासात १८ इंच वाढणारी बीमा बांबुची ही नवीन जात डॉ भारतीय या शास्रज्ञाने शोधून काढली असुन हा वृक्ष ऊती संवर्धन या पद्धतीने तयार केला गेला आहे. हा वृक्ष जास्तीत जास्त बायोमास (जैवअन्न) निर्माण करणारा वृक्ष आहे. बीमा बांबुचे वैशिष्टे म्हणजे कमी खर्च , कमी मजुर तसेच जास्तीत जास्त उत्पादन  देणारा देशी बांबूची वाण असल्याचे प्रतिपादन डॉ कुलकर्णी यांनी केले ते मराठा विद्या  प्रसारक समाज संचलित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयात बीमा बांबु  विषयावर  आयोजित व्याख्यानावर बोलत होते.

डॉ कुलकर्णी यांनी बीमा बांबुचे महत्वाचे फायदे सांगतांना वीजनिर्मितीसाठी , दगडी कोळशाला पर्याय म्हणुन याचा वापर करता येऊ शकतो तसेच यापासुन पाणी शुद्धीकरण, शोभिवंत वस्तूंची निर्मिती करण्यात येतो. तसेच कुठल्याही जमिनीत व कमी पाण्यात सुद्धा याची लागवड करता येऊ शकते. या बांबू लागवडीमुळे गावंपातळीवर चांगला रोजगार  निर्माण करून देणार असल्याने भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे देखील कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी प्रा रामनाथ चौधरी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आय बी चव्हाण , प्रा एस के शेलार , प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.