ylliX - Online Advertising Network

भारतरत्न वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे दर्शन, दि.24 ऑगस्टला रामकुंडात विसर्जन

नाशिक: सार्वभौम भारताचे दिवंगत पंतप्रधान श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिंचे देशभरातील पवित्र नदयांमध्ये विसर्जन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाजपेयींचा अस्थिकलश गुरुवार दि.23 ऑगस्ट रोजी “वसंतस्मृती” भारतीय जनता पार्टी, नाशिक महानगर कार्यालय येथे दिवसभर नाशिककरांच्या दर्शनार्थ ठेवण्यात येणार असून शुक्रवार दि.24 ऑगस्टला अस्थिकलश यात्रा काढून अस्थिंचे पवित्र गोदावरी नदीत विधीवत विसर्जन करण्यात येईल, अशी माहिती महानगर अध्यक्ष आ.बाळासाहेब सानप यांनी दिली.Bharat Ratna atalbihari Vajpayee August 26 astikalash immersion Ramakunda

लोकशाहीचे मापदंड, राजकारणातील पितामह आणि मुत्सद्दी व्यक्तीमत्व म्हणून अजरामर झालेले भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे दि.16 ऑगस्टला निधन झाले आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. त्यांच्या अंत्यविधीला नवी दिल्ली येथे अथांग जनसागर लोटला होता. परंतु इच्छा असून ही ज्यांना अंत्ययात्रेत सहभागी होता आले नाही अशा लोकांना त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेता येणार आहे. देशभरातील पवित्र नदया असलेल्या शहरांमध्ये हे अस्थिकलश नेण्यात आले असून नाशकातही हा अस्थिकलश येणार आहे.Bharat Ratna atalbihari Vajpayee August 26 astikalash immersion Ramakunda

गुरुवार दि.23ऑगस्टला सकाळी 10.30वाजेपासून दिवसभर अस्थिकलश  नागरिकांच्या दर्शनासाठी भाजपा महानगर कार्यालय वसंतस्मृती येथे ठेवण्यात येणार आहे. नंतर शुक्रवार दि.24 ऑगस्टला सकाळी 9.00 वाजता अस्थिकलश यात्रेस वसंतस्मृती कार्यालय येथून प्रारंभ होईल अण्णाभाऊ साठे चौक (जीपीओ समोर)- डॉ.आंबेडकर चौक (गंजमाळ सिग्नल) – स्व.इंदिरा गांधी चौक (शालीमार)- शिवाजी रोड- संतगाडगे महाराज चौक (मेनरोड)- गो.ह.देशपांडे पथ (मेनरोड)- रविवार कारंजा – अहिल्यादेवी होळकर पूल- मालेगांव स्टॅड – पंचवटी कारंजा – मालविय चौक मार्ग रामकुंड येथे अस्थिकलश यात्रा आल्यानंतर रामकुंडावर पवित्र गोदावरी नदीत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिंचे विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे.Bharat Ratna atalbihari Vajpayee August 26 astikalash immersion Ramakunda

अस्थिकलश यात्रेत पालकमंत्री ना. गिरीश महाजन, भाजपा महानगराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनिल बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, ज्येष्ठ नेते विजय साने तसेच नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. (Press Note)

इतर महत्वाच्या बातम्या

आर्मी परिसरात तोफगोळ्याचा स्फोट: एक ठार, चार गंभीर जखमी

घशात अडकले खेकड्याचे कवच, दुर्बिण शस्त्रक्रिया करून काढले बाहेर

भारतरत्न वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे दर्शन, दि.24 ऑगस्टला रामकुंडात विसर्जन

ई-शॉपिंग मॉल बुडाला, कोट्यावधी रुपयांची फसवणूक. जास्त व्याजाला भुलले नाशिककर

घोटी टोल नाका :अपघातात तरुणाचा मृत्यू, सर्वपक्षीय आंदोलन करत टोलनाका केला बंद

अनैतिक सबंध : जेलरोड परिसरात एकाचा खून, आरोपीस अटक

लासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 22 ऑगस्ट 2018

Bharat Ratna atalbihari Vajpayee August 26 astikalash immersion Ramakunda
Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “भारतरत्न वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे दर्शन, दि.24 ऑगस्टला रामकुंडात विसर्जन

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.