ylliX - Online Advertising Network

BF7 Variant Maharashtra चीनमध्ये थैमान घालणाऱ्या BF7 Variant चे रुग्ण महाराष्ट्रात सापडले?

वृत्तसंस्था: चीनबरोबरच जगभारतील देशांमध्ये वाढणारा करोनाचा प्रादुर्भाव आणि केंद्र सरकारने सतर्क राहण्यासंदर्भात दिलेल्या सूचनाच्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांनी नागपूरमधून करोना परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.BF7 Variant Maharashtra

“चीनमध्ये किंवा भारताबाहेर जे चित्र दिसत आहे, प्रसारमाध्यमांनी वार्तांकन केलं आहे ते पाहून केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. राज्यांनाही सांगितलं आहे की तुम्ही याबद्दल सतर्क राहा,” असं तानाजी सावंत म्हणाले. चीनमधील व्हेरिएंटचे रुग्ण महाराष्ट्रात सापडल्याचं वृत्त खोटं असल्याचं तानाजी सावंतांनी स्पष्ट केलं. “काही प्रसारमाध्यमांवर किंवा सोशल मीडियावर महाराष्ट्रात असे नवीन व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्याचं दाखवत असले तरी आमच्याकडे कुठल्याही अधिकृत आकडेवारीमध्ये असा रुग्ण सापडल्याची नोंद नाही. अशा बातम्या येत असतील तर आपलं डिपार्मेंट महाराष्ट्रभर सजग असलं पाहिजे,” असं तानाजी सावंत म्हणाले.

BF7 Variant  Maharashtra
चीनमधील व्हेरिएंटचे रुग्ण महाराष्ट्रात सापडल्याचं वृत्त खोटं असल्याचं तानाजी सावंतांनी स्पष्ट केलं

गुजरातमध्ये BF7 चे दोन रूग्ण?

गुजरातमध्ये BF7 या व्हेरिएंटचे दोन रूग्ण आढळल्याची चर्चा आहे. अशात एक प्रकरण कन्फर्म झालं आहे. एक NRI महिला या व्हेरिएंटने संक्रमित झाली आहे. गुजरातमध्ये या व्हेरिएंटचा रूग्ण आढळण्याच्या आधी BF7 चे इतर रूग्णही आढळले आहेत. ऑक्टोबर महिन्यातही एक रूग्ण आढळला होता. मात्र चीनमध्ये या व्हेरिएंटने कहर माजवला असताना गुजरातमध्ये एक रूग्ण आढळल्याची बातमी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता असल्याचं बोललं जातं आहे. आज तकने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.गुजरातच्या बडोदा या शहरात BF7 या व्हेरिएंटचा एक रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

चीनमधील कोरोना उद्रेकानंतर भारतात दक्षता, आरोग्यमंत्र्यांकडून सूचना

कोरोना अद्याप संपलेला नसल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्कचा उपयोग अत्यावश्यक आहे, अशी स्पष्ट सूचना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी केली आहे. कोरोनासंबंधी निष्काळजीपणा घातक ठरु शकतो. चीन आणि अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे भारतातही अतिसावधानता बाळगणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. नागरिकांना कोरोना विरोधातील लसीचा बूस्टर डोस घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

कोरोना संदर्भात येथे बुधवारी सर्व आरोग्य अधिकाऱयांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मांडविया बोलत होते. सर्व राज्यांना कोरोनासंबंधी दक्षता बाळगण्याच्या आणि जीनोम सिक्वेन्सिंगला प्रारंभ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना रोखण्यासंबंधी साधनसामग्रीची तयारी करुन ठेवण्यासही सांगण्यात आले आहे. सध्या चिंतेचे कारण नसले तरी भविष्याचा विचार करुन आतापासूनच दक्षता बाळगावी असे स्पष्ट करण्यात आले.

विमानप्रवासावर निर्बंध शक्य

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अमेरिका आणि काही युरोपियन देशांमध्येही रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या भारतात येण्यावर काही प्रमाणात निर्बंध घातले जाण्याची शक्यता असल्याची माहिनी सूत्रांनी दिली. विशेषतः चीनमधून येणाऱया प्रवाशांवर, तसेच अन्य देशांमधून येणाऱया चिनी प्रवाशांवर असे निर्बंध लादले जाऊ शकतात. अद्याप तशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, तशीच वेळ ओढवली तर कठोर निर्णय घेणे सरकारला भाग पडणार आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

विभागांचे अधिकारी उपस्थित

आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या बुधवारच्या बैठकीला आरोग्य आणि आयुष विभाग, औषध विभाग, जैवतंत्रज्ञान विभाग, वैद्यकीय संशोधन महामंडळ (आयसीएमआर) आणि नीती आयोग यांचे उच्चाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय तंत्रवैज्ञानिक सल्लागार मंडळाचे अध्यक्षही उपस्थित होते.

अनेक सूचना घोषित

अन्य देशातील कोरोना उद्रेक पाहता भारतातही अतिदक्षता आतापासूनच घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोना काळात पाळल्या जाणाऱया काही नियमांचे पालन सर्वसामान्य नागरिकांनीही आतापासूनच करावे, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. सार्वजनिक स्थानी मास्कचा उपयोग आणि शक्य तितने सामाजिक अंतर राखण्याच्या सूचना करण्यात आल्या. गर्दी न करणे आणि खोकला, ताप, सर्दी अशी लक्षणे दिसू लागल्यास त्वरित तपासणी करुन घेणेही आवश्यक आहे. दुर्लक्ष केल्यास परिस्थिती बिघडू शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोना नियम पाळण्याची राहुल गांधींना सूचना

सध्या काँगेस नेते राहुल गांधी यांची पदयात्रा होत आहे. या यात्रेत भाग घेणाऱया साऱयांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, अन्यथा यात्रा स्थगित करावी, अशी स्पष्ट सूचना केंद्रीय आरोग्य विभागाकडून राहुल गांधी यांना देण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली. यात्रा नव्या नव्या स्थानी जात असल्याने कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी पुरेपूर दक्षता घेण्यात यावी, असे त्यांना कळविण्यात आले आहे. काँगेसने मात्र, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मिळणाऱया प्रतिसादाला घाबरुन भाजप सरकार कोरोनाच्या आड लपू पहात आहे, अशी टीका करत या सूचनांना विरोध दर्शविला आहे. BF7 Variant Maharashtra

चीनमध्ये उद्रेक

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा मोठय़ा प्रमाणात उद्रेक झाला असून दोन वर्षांनंतर प्रथमच प्रतिदिन नव्या रुग्णांची संख्या 2,000 हून अधिक झाली आहे. मात्र, पाश्चात्य पत्रकारांच्या म्हणण्यानुसार चीन रुग्ण आणि मृतांची खरी संख्या लपवत आहे. अनेक शहरांमधील रुग्णालये पूर्ण भरल्याने नव्या रुग्णांना जागा मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे कारमध्ये किंवा खासगी वाहनांमध्ये उपचार केले जात आहेत.

  1. पुढे काय होणार?
  2.  चीन आणि अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक झाल्याने भारतात अतिदक्षता
  3.  राज्यांना केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचना, जीनोम सिक्वेन्सिंग करा
  4.  नागरिकांनी कोरोना नियमांचे शक्य तितके पालन करण्याची सूचना
  5. BF7 Variant Maharashtra
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.