ylliX - Online Advertising Network

Beware of Fake Call ‘या’ फेक कॉल पासून सावध राहा; नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत आवाहन

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की फेक कॉल पासून सावध राहावे. Beware of Fake Call

एका सजग नागरिकाने आपला अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे. हा अनुभव नाशिक शहर पोलिसांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून पोस्ट केला आहे.

तुम्हाला येणाऱ्या कॉलचे संभाषण या आशयाचे असू शकते :-

“मैं आर्मी से बोल रहा हूँ। मेरी ड्युटी जम्मू कश्मीर में है। आपका नाशिक में बँक्वेट हॉल है, वो हमें बीस जुलाई को चाहिए था। हमारी एक बटालियन आपके यहां से गुजर रही हैं। तो आपके आपके यहां थोडा रुक के आराम करके खाना खाके आगे निकलना है। आप कृपया कितना खर्चा होगा ये बतायें।”

मग सदर व्यक्तीने मला व्हॉट्सअॅपवर डिटेल्स पाठवा असे सांगितले आणि त्याने पण मला किती लोक आहेत आणि काय कार्यक्रम आहे हे व्हॉट्सअॅप केले. मागे पण असाच एक फेक कॉल मला आला होता.

आपल्यातल्या काही लोकांना हे माहित पण आहे, सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. मला माहित होते की तो माझे बँक अकाऊंट डिटेल्स किंवा फोनपे डिटेल्स मागेल. पण त्याच्या आतच मी त्याला व्हॉट्सअप केले की, आर्मीसाठी मी सर्व फ्री द्यायला तयार आहे. तुम्ही या, माझी सगळी तयारी झालेली असेल.

त्याने माझे सगळे मेसेजेस वाचले, पण परत काहीच रिप्लाय केला नाही.

तेव्हा मित्रांनो आपण देखील सावधान रहा. अशा कॉल वर विश्वास ठेवू नका.
सर्व नागरिकांना सतर्क राहण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. अशा प्रकारचा कोणताही मेसेज यांना बळी पडू नये. Beware of Fake Call

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.