बंगळुरूच्या गुलाबी कांद्यास निर्यातीची परवानगी; महाराष्ट्राला दिलासा कधी?

नाशिक : बंगळुरूच्या गुलाबी कांद्यास भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने निर्यातीकरिता ३० नोव्हेंबर पर्यंत मर्यादित स्वरुपाची मंजुरी दिली आहे. विदेश व्यापार विभागाचे महासंचालक बिद्युत स्वेन यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.bengaluru onion export allowed

एक महिन्यापूर्वी (२९ सप्टेंबर) महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरी मतदाराला डोळ्यासमोर ठेऊन किरकोळ बाजारातील कांदा भाववाढ रोखण्यासाठी शहरी कांदा निर्यात बंदी सह साठवणुकीवर मर्यादा घातल्या. यामुळे नाशिकसह देशभरात कांदाभावात मोठी झाल्याचे दिसून आले होते.

या सर्व प्रकरणात मात्र महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. कांदा निर्यातबंदी नंतर केवळ नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांत शेतकऱ्यांना शेकडो कोटींचा फटका शेतकऱ्यांना बसून मोठे आर्थिक नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातही अवकाळी पावसानंतर नुकसान होऊनही आता मुबलक प्रमाणात लाल कांदा येण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचाही सरकार लवकरात लवकर विचार करेल एवढ्या आशेवर मराठी शेतकरी बसला आहे.

कर्नाटकच्याच कांद्याला परवानगी का?

मात्र सध्या कर्नाटक राज्यातून नवीन लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात येत असल्याने केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सोमवारी (दि. २८) बंगळूरुच्या गुलाबी कांद्याच्या निर्यातीस मंजुरी दिली आहे. याबाबत जाहीर केलेल्या निर्णयात नऊ हजार टनांपर्यंत या कांद्याची निर्यात करता येणार असून , चेन्नई बंदरावरून या कांद्याची निर्यात करता येणार आहे.

निर्यातीसाठी विविध जाचक अटी :

यासाठी विविध परवानग्यांची आवश्यकता तेथील शेतकऱ्यांना असेल. कर्नाटकचे फलोत्पादन आयुक्त यांच्याकडून निर्यातीसाठी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत कांदा निर्यातीची विशेष परवानगी केंद्र सरकारने दिली आहे.हे प्रमाणपत्र घेतलेल्यांना विदेश व्यापार विभागाच्या अतिरिक्त महासंचालक कार्यालयात नोंदणी करावी लागणार आहे. त्यानुसार पुढील निर्यात विषयक कामकाज होणार आहे.

मालेगाव : अल्पभूधारक कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

महाराष्ट्रात अंदाजे २० लाख हेक्टर सोयाबीन,धान, कापुस , तुर,भाजीपाला, बागायतीचे नुकसान

bengaluru onion export allowed Maharashtra farmers asks ease

रोजचे अपडेट्स व्हाट्सऐप वर मिळविण्यासाठी इथे क्लिक करा.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.