छत्रपती शिवरायांवर आधारीत पहिला मराठी सचेतनपट “प्रभो शिवाजी राजा”

प्रथमच असा प्रयोग होत आहे.Based life Chhatrapati Shivaji Maharaj first Marathi animation film Prabho Shivaji Raja

गणराज असोसिएट्स (Ganraj Associates) प्रस्तुत, इन्फिनिटी विज्यूअल (Infinity Visual) आणि मिफेक (mefac) निर्मित “प्रभो शिवाजी राजा” हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील पहिला मराठी सचेतनपट (animation film) आहे. निलेश मूळे यांचे दिग्दर्शन, समिर मूळे यांची कथा, शंकर महादेवन, स्वप्निल बांदोडकर, नंदेश उमप, उदेश उमप, श्रीरंग भावे यांची गाणी, स्वराधीश डॉ.भरत बलवल्ली यांचे संगित, नंदू घाणेकर यांचे पार्श्वसंगित या सर्वांनी समृद्ध झालेला “प्रभो शिवाजी राजा” हा क्लासिकल टूडी एनिमेशनपट असुन येत्या जानेवारी २०१८ मधे महाराष्ट्रभरात प्रदर्शीत होत आहे.Based life Chhatrapati Shivaji Maharaj first Marathi animation film Prabho Shivaji Raja.

पहिल्यांदाच मराठीमधे निर्मिलेल्या या एनिमेशनपटाचे दोन गोष्टींमुळे नाशिकशी विषेश नाते आहे.पहिलं म्हणजे यामधे सुरुवातीलाच वणीच्या सप्तश्रुंगी मातेसमोर गायले गेलेले एक गाणे दाखवीण्यात आले आहे. शिवकालातील सप्तश्रुंग गड व मंदिर चित्रीत करण्यासाठी ‘प्रभो शिवाजी राजा’ च्या टिम ने विषेश प्रयत्न केले आहेत. साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वीचे सप्तश्रुंग गड व मंदिर एनिमेशन स्वरुपात साकारण्यासाठी अनेक बखरी, ऐतिहासीक दस्तावेज, पुरातन चित्रे, लोककथा तसेच गडाच्या भौगोलिक व वास्तुरचनेचा बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे.

दुसरं म्हणजे या सचेतनपटातमधे नाशिकच्या विजय धारणे या युवकाने महत्वाची भुमिका बजावली आहे. कायदा, पत्रकारीता, जनसंपर्क व राज्यशास्त्र आदी अनेक विषयांचा अभ्यासक व सल्लागार असणा-या विजय ने या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शन एक्झिक्यूशनची धूरा सांभाळली आहे.

अत्यंत विपरीत आणि जुलुमी अशा परकीय आदिलशाह आणि मोगल राजसत्ता भारतात पाय रोवून बसलेल्या असताना सुमारे साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्या राज्याची व गरीब रयतेची मुक्तता करणाऱ्या पुण्यप्रतापी शिवरायांच्या जीवनाची व पराक्रमाची गाथा सदर सचेतनपटातून मांडलेली आहे.

हा सचेतनपट बनवताना अस्सल ऐतिहासिक साधनांचा तसेच इतिहासकारांच्या अभ्यासाचा आधार घेण्यात आला आहे. भारतीय भावी पिढ्यावर सुयोग्य संस्कार व्हावेत, तसेच त्यांना एक आदर्श नागरिक बनून जागरूक समाज आणि देश घडवण्यासाठी प्रेरित करणे हा यामागील उद्देश आहे. हा चित्रपट नसून एक चरित्रपट आहे, ज्याला मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांचा आवाज लाभला आहे.

——————————————————————————————————————

प्रसिद्धी पत्रक,निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा  तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com

Twitter       :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook   :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.